पावसामुळे वाडी शहरातील रस्त्यांची दैनावस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:10 AM2021-09-27T04:10:05+5:302021-09-27T04:10:05+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क वाडी : सलग महिनाभरापासून मुसळधार पावसाच्या सरी बरसत असल्याने तसेच पावसाचे पाणी व्यवस्थित वाहून जात नसल्याने ...

Poor condition of roads in Wadi city due to rains | पावसामुळे वाडी शहरातील रस्त्यांची दैनावस्था

पावसामुळे वाडी शहरातील रस्त्यांची दैनावस्था

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

वाडी : सलग महिनाभरापासून मुसळधार पावसाच्या सरी बरसत असल्याने तसेच पावसाचे पाणी व्यवस्थित वाहून जात नसल्याने वाडी शहरातील अंतर्गत रस्त्यांची दैनावस्था झाली आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे रहदारीस अडसर निर्माण हाेत असून, छाेटेमाेठे अपघातही हाेत आहेत. यावर याेग्य उपाययाेजना करण्याची मागणी केली जात आहे.

वाडी शहरातील बहुतांश वॉर्डातील अंतर्गत रस्त्याच्या निर्मिती व दुरुस्तीचे काम तत्कालीन लोकप्रतिनिधींच्या पुढाकाराने जवळपास पूर्ण झाले होते. पावसाळ्यापूर्वी शहरातील सांडपाणी व छोट्या नाल्यांची साफसफाई करण्यात आली हाेती. पावसाळ्यात आजार व समस्या डोके वर काढणार नाही यासाठी प्रयत्न करून नगर परिषद प्रशासनाने पूर्वनियोजन केले होते. महिनाभरापासून सतत पाऊस सुरू असल्याने शहरातील बहुतांश वॉर्डातील रस्त्यांवरील गिट्टी निघाली असून, रस्ते खड्डेमय झाले आहेत.

त्या खड्ड्यांमध्ये तसेच जागोजागी पाणी साचल्याने पायी चालताना व वाहन चालविताना नागरिकांना अडचणींना ताेंड द्यावे लागत आहे. या प्रतिकूल वातावरणामुळे कीटकजन्य राेग बळावण्याची शक्यता निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये काहीसे भीतीचे वातावरण दिसून येत आहे. जड वाहनांच्या रहदारीमुळे रस्त्यांची दैनावस्था झाली आहे, असेही नागरिकांनी सांगितले. येत्या काही दिवसात शाळामहाविद्यालये पूर्ण क्षमतेने सुरू हाेण्याची शक्यता आहे. त्यामुळे रस्त्यांवरील खड्ड्यांचा विद्यार्थ्यांना त्रास हाेणार असल्याने ते तातडीने बुजविण्यात यावेत, अशी मागणीही केली जात आहे.

...

शहरातील मान्सूनपूर्व सर्व कामे वेळेवर करण्यात आली. डेंग्यूची लागण हाेऊ नये म्हणून साफसफाई तर काेराेनाचे रुग्ण वाढू नयेत म्हणून लसीकरणावर भर देत या दोन्ही आजारांबाबत जनजागृती करण्यात आली. सततच्या पावसामुळे शहरातील रस्ते खड्डेमय झाले आहेत. त्यात पावसाचे पाणी साचून राहत आहे. यावर वेळीच याेग्य उपाययाेजना करून नागरिकांच्या समस्या साेडविल्या जातील.

- जुम्मा प्यारेवाले, मुख्याधिकारी, नगर परिषद, वाडी

260921\img-20210926-wa0070.jpg

photo

Web Title: Poor condition of roads in Wadi city due to rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.