पूर्वा कोठारी यांचे इन्ट्रिया प्रदर्शन २० व २१ रोजी नागपुरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 10:15 AM2018-10-18T10:15:33+5:302018-10-18T10:18:41+5:30
नामांकित ज्वेलरी डिझायनर पूर्वा कोठारी आपले आधुनिक डिझाईन २० व २१ आॅक्टोबरला नागपुरात आयोजित ‘इन्ट्रिया’ ज्वेलरी प्रदर्शनाच्या माध्यमातून आणत आहेत.
अंकिता देशकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मी निसर्ग आणि प्रेमाकडे सर्वाधिक आकर्षित झाले असून त्याचा समावेश माझ्या सर्व दागिन्यांमध्ये केला आहे. फुले माझी जीवनवृत्ती आहे. अलीकडेच जपानला गेले असता सर्वत्र चेरीची बहारदार फुले पाहून मन बहरून आले. हा क्षण मला प्रेरणा देणारा होता, असे मत नामांकित ज्वेलरी डिझायनर पूर्वा कोठारी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
पूर्वा कोठारी आपले आधुनिक डिझाईन २० व २१ आॅक्टोबरला नागपुरात आयोजित ‘इन्ट्रिया’ ज्वेलरी प्रदर्शनाच्या माध्यमातून आणत आहेत.
ज्वेलरीच्या एका तुकड्याच्या डिझाईन प्रक्रियेबाबत विचारले असता पूर्वा म्हणाल्या, दागिन्यांच्या बाह्यरेखेला कोणता स्टोन जाईल याची कल्पना करण्याऐवजी प्रथम डिझाईनवर भर देते. ते आवडल्यानंतर त्या विशिष्ट डिझाईनमध्ये कोणता स्टोन चांगला दिसेल, यावर लक्ष केंद्रित करते. मग ते माणिक, पाचू, हिरे, नीलम अथवा त्यांचे मिश्रण असोत. दागिन्यांचे डिझाईन करण्यासाठी आवडत्या थीमबद्दल त्या म्हणाल्या, जेव्हा मी काहीतरी डिझाईन करते तेव्हा ते परिधान करायला मला आवडेल का, याचा विचार करते. भारतीय-पश्चिमी संकल्पनेत मी खूप सूक्ष्म आणि सौम्य डिझाईनसह खूप प्रयोग करते. दागिने कुटुंबाचा वारसा म्हणून चालविले जावेत, असे मला वाटते. ही गोष्ट नुकतीच घडली आहे. एका महिलेने १५ वर्षांपूर्वी खरेदी केलेला नेकपीस आता तिच्या मुलीला लग्नात द्यायचा आहे. आजच्या पिढीला आवाहन करणे हे खूप आव्हानात्मक आहे. तरीही माझा प्रयोग सुरूच आहे. जडाऊ दागिने आज व्यावहारिक नाहीत. त्यामुळे माझा पारपंरिक आणि समकालीन दागिन्यांवर भर असतो. दररोज घालता येईल, असे दागिने तयार करणे आवडते आणि ते तरुण व कार्यालयीन लोकांना आवडावेत, असे मला वाटते. इन्ट्रिया प्रदर्शनात रोज गोल्डमध्ये डिझाईन केलेले अनेक दागिने राहतील. रोज गोल्ड किंवा पिंक गोल्डवर असलेल्या प्रेमाविषयी त्या म्हणाल्या, रोज गोल्ड भारतीय त्वचेला सुशोभित करते आणि जो कुणी परिधान करतो त्यावर ते सुंदर दिसतात. यावर्षीच्या इन्ट्रियामध्ये रोज गोल्डचे कलेक्शन नक्कीच राहील, असे पूर्वा यांनी सांगितले.
पूर्वा कोठारी दागिन्यांमध्ये डान्सिंग डायमंडची नवीन संकल्पना सादर करीत आहेत. या दागिन्यांची सुंदरता वेगळीच आहे. मी काही पिसेस तयार केले आहेत. जो कुणी या दागिन्यांचा वापर करेल त्यांना हिरा मुक्तपणे फिरत असल्याचे जाणवेल, असे पूर्वा यांनी उत्साहाने सांगितले. इन्ट्रियासंदर्भात पूर्वा म्हणाल्या, या वर्षीचे कलेक्शन अतिशय पॉकेट फ्रेंडली राहील, पण त्यात अद्याप कोणतीही तडजोड केलेली नाही. या कलेक्शनमध्ये सर्वोत्तम हिरे, सर्वोत्तम कट आणि सर्वोत्तम बनावट यांचा समावेश केला आहे. डिझाईनसंदर्भात त्या म्हणाल्या, तुकड्यांना पुन्हा डिझाईन करणे आवडते. पूर्वा यांच्या डिझाईनबद्दल बोलायचे झाल्यास त्यांचे डिझाईन अद्वितीय आहेत आणि त्याची त्या कधीही पुनरावृत्ती करीत नाहीत. दागिन्यांची ही शैली एकसारखीच आहे, परंतु ती कधीच एकसारखी नसते. पूर्वा यांना फिरता आणि लवचिक असलेल्या तुकड्यांना डिझाईन करणे आवडते. जर मी रुचीनुसार दागिने तयार करीत असेल तर निश्चितपणे मनात विशिष्ट व्यक्ती ठेवते. पण मला काय हवे आहे, हे मला नेहमीच वाटते. मी आईला पाहून मोठी झाली आहे. ती निर्दोष आणि संयमी होती. माझी पे्ररणा ही माझ्या आईत दडलेली आहे, असे सांगून पूर्वा यांनी आईच्या आठवणीला उजाळा दिला. पूर्वा यांचे डिझाईन केवळ अभिजात वर्गासाठीच नव्हे तर सर्वांसाठी आहे. यावर्षी इन्ट्रियाचा खजाना सर्वांसाठी खुला राहणार असून सर्वाधिक पॉकेट फ्रेंड्ली असेल.
दागिने जोपासण्याच्या टिप्स
आम्ही सर्वसाधारणपणे दागिने सुरक्षित ठेवतोच, परंतु काही विशिष्ट उपाययोजना केल्या पाहिजेत. त्या खालीलप्रमाणे आहेत.
- दागिने नेहमीच कॉटन अथवा मलमलच्या कपड्यात ठेवावेत.
- चांदी आणि सोन्याचे दागिने एकत्र ठेवू नये.
- चमकण्यासाठी दागिन्यांना सहा वर्षांतून एकदा पॉलिश करा.
- दागिन्यांचे छोटे पिसेस साबणाच्या पाण्याने घरीच स्वच्छ करावेत.