पीओपी : नागपुरात २३ मूर्ती विक्रेत्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 11:53 PM2018-09-08T23:53:14+5:302018-09-08T23:54:21+5:30
तलावांचे प्रदूषण टाळण्यासाठी बाजारात विक्रीस असलेल्या प्लॅस्टर आॅफ पॅरिस (पीओपी) च्या मूर्तीची विक्री नियमानुसार करणे गरजेचे आहे. शहरात गणेश उत्सवासाठी मूर्ती विक्री करणाऱ्या विक्रेत्यांनी मातीची मूर्ती असल्याचे सांगून पीओपीची मूर्ती विकत आहे. यासंदर्भात महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे तक्रारी येत आहे. त्यामुळे मनपाच्या आरोग्य विभागाने स्वच्छता दूतांसोबत शहरातील विविध ठिकाणी कारवाई केली. शनिवारी १०१ मूर्ती विक्रेत्यांच्या दुकानांची तपासणी करण्यात आली. यात २३ मूर्ती विक्रेत्यांच्या विरुद्ध कारवाई करीत, १९ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. पुन्हा पीओपीची मूर्ती नियमानुसार न विकल्यास दुकान हटविण्याचा इशारा दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तलावांचे प्रदूषण टाळण्यासाठी बाजारात विक्रीस असलेल्या प्लॅस्टर आॅफ पॅरिस (पीओपी) च्या मूर्तीची विक्री नियमानुसार करणे गरजेचे आहे. शहरात गणेश उत्सवासाठी मूर्ती विक्री करणाऱ्या विक्रेत्यांनी मातीची मूर्ती असल्याचे सांगून पीओपीची मूर्ती विकत आहे. यासंदर्भात महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे तक्रारी येत आहे. त्यामुळे मनपाच्या आरोग्य विभागाने स्वच्छता दूतांसोबत शहरातील विविध ठिकाणी कारवाई केली. शनिवारी १०१ मूर्ती विक्रेत्यांच्या दुकानांची तपासणी करण्यात आली. यात २३ मूर्ती विक्रेत्यांच्या विरुद्ध कारवाई करीत, १९ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. पुन्हा पीओपीची मूर्ती नियमानुसार न विकल्यास दुकान हटविण्याचा इशारा दिला आहे.
गांधीबाग झोन अंतर्गत येणाऱ्या चितारओळ, सेंट्रल एव्हेन्यू रोडवरील दुकानांची तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, सतरंजीपुरा, लकडगंज झोन मध्येही मूर्ती विक्रेत्यांकडून तपासणी करण्यात आली. येत्या १३ सप्टेंबर रोजी गणपतीची स्थापना होणार आहे. त्यामुळे ठिकठिकाणी मूर्तीची दुकाने लागली आहे. मनपाच्या आरोग्य विभागाने स्पष्ट निर्देश दिले आहे की पीओपीची मूर्ती विकताना मागे लाल चिन्ह लावावे. सोबतच मूर्तीला कृत्रिम टँकमध्ये विसर्जन करण्याचा संदेश दुकानात पोस्टर बॅनर लावून करावा. परंतु मूर्ती विक्रेते पीओपीच्या मूर्तीला मातीच्या मूर्ती असल्याचे सांगून जास्त किंमतीवर विकत आहे.
पीओपीच्या मूर्तीला कृत्रिम टँकवर विसर्जन करा - दासरवार
आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार यांनी सांगितले की, वेगवेगळ्या झोन अंतर्गत मूर्ती विक्रेत्यांची तपासणी करण्यात आली. दुकानदारांना नियमांचे पालन करण्याची ताकीद देण्यात आली. ज्यांनी नियम पाळले नाही, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. डॉ. दासरवार यांनी नागरिकांना आवाहन केले की, मातीच्या मूर्ती स्थापन कराव्यात. जर पीओपीच्या मूर्तीची स्थापना केली असेल तर विसर्जन कृत्रिम तलावात करावे.