बहुचर्चित बुकी सोंटू जैनला सर्वोच्च न्यायालयातही दणका; अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला

By राकेश पांडुरंग घानोडे | Published: October 9, 2023 06:37 PM2023-10-09T18:37:43+5:302023-10-09T18:40:32+5:30

सर्वोच्च न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.

popular bookie sontu jain pre arrest bail application rejected by supreme court | बहुचर्चित बुकी सोंटू जैनला सर्वोच्च न्यायालयातही दणका; अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला

बहुचर्चित बुकी सोंटू जैनला सर्वोच्च न्यायालयातही दणका; अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला

googlenewsNext

राकेश घानोडे, नागपूर : ऑनलाईन जुगाराच्या नादी लावून व्यापाऱ्याची ५८ कोटी ४२ लाख रुपयांनी फसवणूक करणारा बहुचर्चित बुकी अनंत उर्फ सोंटू नवरतन जैन (४०) याला सोमवारी सर्वोच्च न्यायालयातही दणका बसला. सर्वोच्च न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.

आधी सत्र न्यायालयाने व त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अटकपूर्व जामीन नाकारल्यामुळे सोंटूने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. विक्रांत अग्रवाल, असे फसवणूक झालेल्या व्यापाऱ्याचे नाव असून ते नागपूर येथील रहिवासी आहेत. ते तांदळाचे व्यापारी आहेत. त्यांच्या तक्रारीवरून गेल्या जुलैमध्ये सदर सायबर पोलिसांनी सोंटूविरुद्ध भादंवि कलम ३८६, ४२०, ४६८, ४७१, १२०-ब व माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६६-डी अंतर्गत एफआयआर दाखल केला आहे. तसेच, सोंटूच्या गोंदियातील घरातून १७ कोटी रुपये रोख, १४ किलो सोने व २९४ किलो चांदी तर, लॉकरमधून ८५ लाख रुपये रोख व सुमारे ४ कोटी ५० लाख रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

Web Title: popular bookie sontu jain pre arrest bail application rejected by supreme court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.