२२ लाखांवर लोकसंख्या, व्हेंटिलेटर केवळ ९४

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:07 AM2021-05-09T04:07:59+5:302021-05-09T04:07:59+5:30

अपुरी यंत्रणा, परिस्थती भयावह : आठ तालुक्यांत व्हेंटिलेटरच नाही : पॉझिटिव्हिटी दर ४० टक्क्यांवर नागपूर : सक्षम आणि भक्कम ...

Population over 22 lakhs, ventilators only 94 | २२ लाखांवर लोकसंख्या, व्हेंटिलेटर केवळ ९४

२२ लाखांवर लोकसंख्या, व्हेंटिलेटर केवळ ९४

Next

अपुरी यंत्रणा, परिस्थती भयावह : आठ तालुक्यांत व्हेंटिलेटरच नाही : पॉझिटिव्हिटी दर ४० टक्क्यांवर

नागपूर : सक्षम आणि भक्कम आरोग्य यंत्रणेच्या बळावरच कोरोनाचा लढा यशस्वी दिला जाऊ शकतो. पण, ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणाच अपुरी आहे. २२ लाखांवर लोकसंख्या असलेल्या ग्रामीण भागात केवळ ९४ व्हेंटिलेटर बेड आहेत. विशेष म्हणजे, आठ तालुक्यांत तर व्हेंटिलेटरच नाही. व्हेंटिलेटर सोडा, ऑक्सिजनचे बेड एक टक्काही उपलब्ध नाही. संक्रमण गावागावांत पसरले आहे. तुलनेत चाचण्याही कमी होत आहेत. अशातही दोन आठवड्यांपासून पॉझिटिव्हिटी दर ४० टक्क्यांच्या पुढे गेला आहे. प्रकृती अत्यवस्थ झाल्यास शहराशिवाय पर्याय नाही आणि शहरात बेड उपलब्ध नाहीत. अधिकृत मृत्यूचा आकडा दोन हजारांवर पोहोचला आहे. ज्यांची नोंदच होत नाही, ती संख्या त्यापेक्षा दुप्पट आहे. यंत्रणा तोकडी आणि परिस्थिती भयावह आहे. प्रशासन, लोकप्रतिनिधी लगेच सावध न झाल्यास तिसऱ्या लाटेत कोरोना कहर घातल्याशिवाय राहणार नाही. ‘लोकमत’च्या पथकाने ग्रामीण भागातील भयावह स्थितीवर घेतलेला आढावा....

नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात १३ महसूल अधिकारी, १३ पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी, १४ नगर परिषद व सहा नगरपंचायतींचे मुख्याधिकारी अशी भक्कम प्रशासकीय यंत्रणा आहे. आरोग्याबाबत बोलायचे झाल्यास ४९ प्राथमिक आरोग्य केंद्रे, ३१६ उपकेंद्रे, प्रत्येक तालुक्यात ग्रामीण रुग्णालय व नगर परिषद, नगरपंचायतीची स्वत:ची आरोग्य यंत्रणा आहे. कोरोनाचा प्रकोप लक्षात घेता, ही सर्व यंत्रणा कोरोनाला थांबविण्यासाठी पुरेशी नाही. त्यामुळे ग्रामीण भागात कोरोना सुसाट झाला आहे. अनेकांचे जीव गेले आहेत. अनेक जण मृत्यूच्या दाढेत आहेत. ग्रामीण भागात आरोग्याची लढाई अपुऱ्या मनुष्यबळावर आणि वर्षानुवर्षे न बदलेली व्यवस्था, यंत्रणेवर सुरू आहे. त्यामुळे व्हिटॅमिनच्या गोळ्या, लसीकरण आणि गंभीर झाल्यास शहराकडे धाव घेण्याशिवाय पर्याय नाही.

- तालुकानिहाय आरोग्याची व्यवस्था

१) रामटेक

लोकसंख्या - १ लाख ५४ हजार

प्राथमिक आरोग्य केंद्रे - ५

कोरोना केअर सेंटर - ४

ऑक्सिजन बेड - ६५

व्हेंटिलेटर बेड - ०

२) कळमेश्वर

लोकसंख्या - १ लाख २० हजार

प्राथमिक आरोग्य केंद्रे - ४

कोरोना केअर सेंटर - १

ऑक्सिजन बेड - ५

व्हेंटिलेटर बेड - ०

३) नरखेड

लोकसंख्या - १ लाख ४७ हजार ९०७

प्राथमिक आरोग्य केंद्रे - ५

कोरोना केअर सेंटर - २

ऑक्सिजन बेड - १२

व्हेंटिलेटर बेड - ३

४) हिंगणा

लोकसंख्या - २ लाख ४२ हजार १९८

प्राथमिक आरोग्य केंद्रे - ४

कोरोना केअर सेंटर - १

ऑक्सिजन बेड - ३२०

व्हेंटिलेटर - २५

५) कुही

लोकसंख्या - १ लाख १७ हजार ५६७

प्राथमिक आरोग्य केंद्रे - ४

कोरोना केअर सेंटर - १

ऑक्सिजन बेड - ५३

व्हेंटिलेटर - ०

६) उमरेड

लोकसंख्या - १ लाख ५४ हजार १८०

प्राथमिक आरोग्य केंद्रे - ४

कोरोना केअर सेंटर - ५

ऑक्सिजन बेड - ९८

व्हेंटिलेटर बेड - २

७ ) सावनेर

लोकसंख्या : २ लाख ३८ हजार ८५५

प्राथमिक आरोग्य केंद्र - ५

कोरोना केअर सेंटर - २

ऑक्सिजन बेड - १५

व्हेंटिलेटर बेड - 00

८) काटोल

लोकसंख्या - १ लाख ६० हजार ५५३

प्राथमिक आरोग्य केंद्रे - ४

कोरोना केअर सेन्टर - ३

ऑक्सिजन बेड - २०

व्हेंटिलेटर बेड - ००

९) भिवापूर

लोकसंख्या - ८१६२४

प्राथमिक आरोग्य केंद्रे - ३

कोरोना केअर सेंटर - १

ऑक्सिजन बेड - २०

व्हेंटिलेटर बेड - ००

१० ) कामठी

लोकसंख्या - २ लाख ६९ हजार

प्राथमिक आरोग्य केंद्र - ३

कोविड केअर सेंटर - ९

ऑक्सिजन बेड - ५९१

व्हेंटिलेटर बेड - ४६

११) नागपूर

लोकसंख्या - २ लाख ६८ हजार ५६९

प्राथमिक आरोग्य केंद्रे - २

कोरोना केअर सेंटर - २०

ऑक्सिजन बेड - ४४९

व्हेंटिलेटर बेड - १८

१२ ) पारशिवणी

लोकसंख्या - १ लाख ४७ हजार

प्राथमिक आरोग्य केंद्रे - ५

कोरोना केअर सेंटर - २

ऑक्सिजन बेड -४८

व्हेंटिलेटर बेड - ०

१३ ) मौदा

लोकसंख्या : १ लाख ४७ हजार

प्राथमिक आरोग्य केंद्रे - ५

कोरोना केअर सेंटर - १

ऑक्सिजन बेड - २०

व्हेंटिलेटर बेड - ००

०-००-०-

- ज्यांच्याकडे गृहविलगीकरणाची सोय नसेल, त्यांना रामटेकला कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल केले जाते. ऑक्सिजनची गरज असलेल्यांना ऑक्सिजन बेड उपलब्ध करून दिला जातो. रुग्ण गंभीर झाल्यास नागपुरात पाठविले जाते.

- डॉ. चेतन नाईकवार, तालुका आरोग्य अधिकारी, रामटेक

----

- आमचा लसीकरणावर जोर आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीला पालक नेमण्यात आला आहे.

- महेश्वर डोंगरे, बीडीओ, पंचायत समिती कळमेश्वर

----

- रुग्णांच्या प्रकृती गंभीरतेनुसार गृह विलगीकरणात ठेवणे, कोविड केअर सेंटर ते रुग्णवाहिकेची व्यवस्थी करून रूग्णाला नागपूर येथील मेडिकलला पाठविणे. लसीकरणावर जोर देणे सध्या सुरू आहे.

- नीलिमा सतीश रेवतकर, सभापती, पंचायत समिती, नरखेड.

----

- तालुक्यात मृत्यूचे प्रमाण कमी आहे. सर्व आरोग्य पथके रुग्णसेवेत कार्यरत आहेत. ५५ हजार नागरिकांनी लस घेतली. १८ ते ४५ वर्षे वयोगटातील लसीकरण सुरू झाले नाही. एमआयडीसीतील कामगार वर्गात लसीकरण वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे.

- डॉ. प्रवीण पडवे, तालुका आरोग्य अधिकारी, हिंगणा

---

- व्हेंटिलेटर बेड नाही, बायफॅब मशीन आहे, परंतु तज्ज्ञ डॉक्टरचा अभाव आहे. त्यामुळे व्हेंटिलेटरचा अजूनपर्यंत वापर वा उपयोग झालेला नाही. रुग्णसंख्या वाढली, पण मृत्यूचे प्रमाण कमी आहे. ६६१ रुग्ण असून, ६३६ गृहविलगीकरणात आहे. जनजागृती करून लसीकरण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

- डॉ. राजेश गिलानी, तालुका आरोग्य अधिकारी, कुही

---

- तहसील कार्यालय येथे कंट्रोल रूम आहे. इथूनच तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीमार्फत कार्यप्रणाली चालते. समस्यांचे निराकरण केले जाते.

डॉ. निशांत नाईक, पर्यवेक्षक, तालुका आरोग्य कार्यालय, उमरेड

---

- सध्या लसीकरण सुरू आहे. लॉकडाऊन आणि कंटेन्मेंट झोन झाल्याने स्थिती नियंत्रणात आहे. पॉझिटिव्हिटी रेटसुद्धा कमी झाला आहे.

- डॉ. प्रशांत वाघ, तालुका आरोग्य अधिकारी, सावनेर

---

चाचणीचे प्रमाण वाढले होते, परंतु किटअभावी चाचण्या झालेल्या नाहीत. लक्षणे असलेल्या नागरिकांना आम्ही घरीच राहण्याचा सल्ला देतो. गावात पथक पाठवून चाचणी अभियान राबवतो.

- डॉ. शशांक व्यवहारे, तालुका आरोग्य अधिकारी, काटोल

---

सध्या तालुक्याची परिस्थिती नियंत्रणात आहे. तिसऱ्या लाटेवर वेळीच नियंत्रण कसे मिळविता येईल, या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे. लसीकरणाला प्राधान्य दिले आहे. तीनही प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड सेंटर सुरू करण्याचा विचार आहे.

- माणिक हिमाणे, बीडीओ, पंचायत समिती, भिवापूर

----

गंभीर अवस्था असलेल्या रुग्णांना प्रथम कोविड केअर सेंटरमध्ये औषधोपचार केला जातो. प्रकृती चिंताजनक झाल्यास त्यांना तातडीने नागपूरला हलविले जाते.

- डॉ. तारीक अन्सारी, कोविड इन्चार्ज, पारशिवनी

Web Title: Population over 22 lakhs, ventilators only 94

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.