पॉझिटिव्ह आले, उपचार केला, बरे झाले आणि पुन्हा कामावर परतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2020 01:28 AM2020-08-15T01:28:12+5:302020-08-15T01:29:41+5:30
कोविड-१९ च्या वाढत्या संसर्गादरम्यान दिलासा देणारी ही बातमी आहे. पॉझिटिव्ह रुग्ण बरे होत आहेतच परंतु ते आता आपल्या कामावरही परत येऊ लागले आहेत. प्रशासकीय अधिकाऱ्यांपासून तर वीज विभागातील कर्मचाऱ्यांपर्यंत यात सहभागी आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, त्यांनी वेळेवर तपासणी करून घेतली. त्यामुळे वेळेवर उपचार मिळाल्याने ते लवकर बरे होऊन पूर्वीप्रमाणेच आपल्या कामाची जबाबदारीही सांभाळण्यास सज्ज झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविड-१९ च्या वाढत्या संसर्गादरम्यान दिलासा देणारी ही बातमी आहे. पॉझिटिव्ह रुग्ण बरे होत आहेतच परंतु ते आता आपल्या कामावरही परत येऊ लागले आहेत. प्रशासकीय अधिकाऱ्यांपासून तर वीज विभागातील कर्मचाऱ्यांपर्यंत यात सहभागी आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, त्यांनी वेळेवर तपासणी करून घेतली. त्यामुळे वेळेवर उपचार मिळाल्याने ते लवकर बरे होऊन पूर्वीप्रमाणेच आपल्या कामाची जबाबदारीही सांभाळण्यास सज्ज झाले आहेत.
गुरुवारपर्यंत जिल्ह्यात कोविड-१९ चे ५७७३ अॅक्टीव्ह केसेस होते. यात ५५१६ आता बरे झाले आहेत. बरे होणाऱ्यांमध्ये अनेक सरकारी कर्मचारीही आहेत. तहसील कार्यालयातील उपविभागीय अधिकाऱ्याचाही यात समावेश आहे. ते आता पूर्णपणे बरे होऊन कामावर परत आले आहेत. कोविड -१९ प्रभावित ३० टक्के पोलीस कर्मचारीही आता कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यास सज्ज झाले आहेत. कोरोनावर मात करून आपापल्या कामावर परत आलेल्यांमध्ये सर्वाधिक कर्मचारी महावितरणचे आहेत. कंपनीत आतापर्यंत एकूण ३१ कर्मचारी पॉझिटिव्ह झाले आहेत. यापैकी २० कर्मचारी चक्रीवादळ्यादरम्यान झालेल्या नुकसानीच्या दुरुस्तीच्या कामासाठी रायगडला गेले होते, ते आहेत. तेथून परत येताच त्यांची टेस्ट करण्यात आली होती. यापैकी १८ कर्मचारी आता बरे झाले असून १७ कर्मचारी कामावर परत आले आहेत. केवळ एक कर्मचारी अजूनपर्यंत कामावर परतलेला नाही. कारण तो ज्या भागात राहतो तो भाग सील करण्यात आलेला आहे. र्वरित १४ कर्मचारी अलीकडेच पॉझिटिव्ह आले. कामावर परत आलेले सर्व कर्मचारी पूर्वीप्रमाणेच आपली जबाबदारी पार पाडत आहेत.
निगेटिव्ह आल्यानंतर होम क्वारंटाईन
बरे झालेल्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, निगेटिव्ह आल्यानंतरही त्यांना ७ दिवस होम क्वारंटाईन राहण्यास सांगितले होते. हा कालावधी पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कार्यालयाला याची सूचना दिली. कार्यालयाकडून परवानगी मिळाल्यानंतर ते पुन्हा कामावर परत आले आहेत.
लाईनमनने केली कोरोनावर मात
महावितरणच्या काँग्रेसनगर डिव्हीजनमधील एक लाईनमननेही कोविड १९ ला मात दिली आहे. श्रीकृष्णनगर येथील रहिवासी असलेला हा लाईनमन आता पूर्वीप्रमाणेच धंतोलीत आपले काम करीत आहे. वीज गेल्याची तक्रार येताच ते दुरुस्ती करायला निघतात. पूर्वीप्रमाणेच खांबावर चढून दुरुस्तीचे काम करतात. कोकणात गेलेल्या कर्मचाऱ्यांपैकी ते एक आहेत. तिथेच त्यांना संसर्ग झाला होता. सध्या ते पूर्वीप्रमाणेच आपले काम करीत आहेत. त्यांचे सहकारीही त्यांना दुरुस्तीच्या कामात पूर्ण सहकार्य करीत आहेत.