पॉझिटिव्ह रुग्ण वाढले, रिकव्हरी रेट घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:17 AM2021-01-08T04:17:41+5:302021-01-08T04:17:41+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी ४०० पेक्षा अधिक नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले ...

Positive patients increased, recovery rate decreased | पॉझिटिव्ह रुग्ण वाढले, रिकव्हरी रेट घसरला

पॉझिटिव्ह रुग्ण वाढले, रिकव्हरी रेट घसरला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी ४०० पेक्षा अधिक नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. तर बरे होणाऱ्यांची संख्या घसरली आहे. त्यामुळे नागपूरचा रिकव्हरी रेट घसरून ९३.४७ वर पोहोचला आहे.

सध्या सक्रिय रुग्णांची संख्या ४२५६ इतकी झाली आहे. गेल्या २४ तासात ४३४ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून ८ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १,२६,१८९ इतकी झाली असून ३९८४ जणांचा मृत्यू झाला आहे तर आतापर्यंत १,१७,९४९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. नागपूर जिल्ह्यात आज आढळलेल्या रुग्णांमध्ये शहरातील ३४४, ग्रामीणमधील ८७ आणि जिल्ह्याबाहेरचे ३ जण आहेत. मृतांमध्ये शहरातील ३, ग्रामीणमधील २ आणि ३ जण जिल्ह्याबाहेरचे आहेत. गेल्या २४ तासात ४९७० जणांचे नमुने तपासण्यात आले. यात शहरातील ३७८७ आणि ग्रामीणमधील ११८३ आहेत.

सक्रिय- ४२५६

बरे झालेले - १,१७,९४९

मृत - ३९८४

Web Title: Positive patients increased, recovery rate decreased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.