नागपुरात कोव्हॅक्सिन लसीच्या तुटवड्याची शक्यता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 09:33 AM2021-03-26T09:33:41+5:302021-03-26T09:34:45+5:30

Coronavirus vaccine updates Nagpur news आरोग्य विभागाला कोविशिल्ड लसीचे पुढील दोन दिवसांत साधारण दीड लाख, तर नंतरच्या चार दिवसांत दोन लाख, एकूण साडेतीन लाख डोस मिळणार आहेत. मात्र यात, कोव्हॅक्सिन लसीचा समावेश नाही.

Possibility of Kovacin vaccine shortage in Nagpur! | नागपुरात कोव्हॅक्सिन लसीच्या तुटवड्याची शक्यता!

नागपुरात कोव्हॅक्सिन लसीच्या तुटवड्याची शक्यता!

Next
ठळक मुद्देकोविशिल्डचे साडेतीन लाख डोस येणार कोव्हॅक्सिन लसीचा यात समावेशच नाही

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : आरोग्य विभागाला कोविशिल्ड लसीचे पुढील दोन दिवसांत साधारण दीड लाख, तर नंतरच्या चार दिवसांत दोन लाख, एकूण साडेतीन लाख डोस मिळणार आहेत. मात्र यात, कोव्हॅक्सिन लसीचा समावेश नाही. ग्रामीणमध्ये रोज जवळपास दीड हजार, तर शहरात ६००वर लाभार्थ्यांना ही लस दिली जात आहे. २८ मार्चपासून दुसरा डोस, तर १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण सुरू होणार आहे. परिणामी, कोव्हॅक्सिन लसीच्या तुटवड्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नागपूर जिल्ह्यात दिवसाकाठी १८ ते २० हजार लस दिली जात आहे. शहरात ७४ लसीकरण केंद्र आहेत. यात मेडिकलमध्ये दोन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, विवेका हॉस्पिटल, हंसापुरी आयुर्वेदिक डिस्पेंसरी व महाल डायग्नोस्टिक सेंटर या सहा केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस दिली जाते. एका दिवसांत ६०० ते ६५० लाभार्थ्यांना लस दिली जाते. ग्रामीणमध्ये एकूण ९३ केंद्र आहेत. यातील २१ केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस दिली जाते. रोज २१०० लसीकरणाचे लक्ष्य दिले जात असताना दीड हजार लसीकरण होते. शहर आणि ग्रामीण मिळून जवळपास कोव्हॅक्सिनचे दोन हजार डोस दिले जात आहेत. परंतु २८ मार्चपासून दुसरा डोस तर पुढील महिन्यापासून ४५ वर्षांवरील सर्वांत्या लसीकरणाला सुरुवात होत आहे. या दरम्यान लसीचा साठा न आल्यास तुटवड्याची शक्यता आहे. उपलब्ध माहितीनुसार, नागपूर जिल्ह्याला १२ मार्च रोजी आरोग्य विभागाकडून केवळ २० हजार ४०० डोस मिळाले होते. त्यानंतर डोसचा साठा उपलब्ध झालेला नाही.

- तीन दिवस पुरेल एवढाचा कोविशिल्डचा साठा

नागपूर महानगरपालिकेकडे पुढील तीन दिवस पुरेल एवढाचा कोविशिल्डचा साठा आहे. याला मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर यांनी दुजोराही दिला. ‘लोकमत’शी बोलताना ते म्हणाले, सध्या ३० हजार कोविशिल्डचे डोस उपलब्ध आहेत. आरोग्य विभागाला लसीची मागणी केली आहे. लवकरच ते उपलब्ध होईल. तुटवडा पडणार नाही.

Web Title: Possibility of Kovacin vaccine shortage in Nagpur!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.