विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 11:46 PM2019-02-18T23:46:06+5:302019-02-18T23:47:01+5:30

विदर्भ आणि मराठवाड्यातील हवामान अस्थिर होणार असल्यामुळे २० ते २१ फेब्रुवारीदरम्यान काही भागात वादळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. अमरावती, अकोला, बुलडाणा आणि वाशीम जिल्ह्यातील बऱ्याच भागात या काळात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच यवतमाळ, वर्धा, नागपूर, जालना, परभणी, हिंगोली आणि औरंगाबाद जिल्ह्यातील काही भागातदेखील वादळी पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

The possibility of windy rain in Vidarbha and Marathwada | विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता

विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता

Next
ठळक मुद्देहवामान तज्ज्ञांचा अंदाज : शेतकऱ्यांनी नियोजन करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भ आणि मराठवाड्यातील हवामान अस्थिर होणार असल्यामुळे २० ते २१ फेब्रुवारीदरम्यान काही भागात वादळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. अमरावती, अकोला, बुलडाणा आणि वाशीम जिल्ह्यातील बऱ्याच भागात या काळात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच यवतमाळ, वर्धा, नागपूर, जालना, परभणी, हिंगोली आणि औरंगाबाद जिल्ह्यातील काही भागातदेखील वादळी पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
वादळी पावसासोबत काही प्रमाणात गारपीट होण्याचीदेखील शक्यता आहे. या आठवड्यात संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यातील तापमानात वाढ होऊन २० ते २२ फेब्रुवारीदरम्यान काही प्रमाणात ढगाळ वातावरण राहील, असे हवामान तज्ज्ञांनी सांगितले आहे.
शेतकऱ्यांनी या हवामानाच्या परिस्थितीनुसार नियोजन करून शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवावा. बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल तर तो व्यवस्थितपणे झाकून ठेवावा. वादळी पावसाच्या दरम्यान सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. मोकळ्या मैदानात तसेच झाडाखाली अथवा पत्र्याच्या शेडमध्ये थांबणे टाळावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

Web Title: The possibility of windy rain in Vidarbha and Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.