पाचही पाटबंधारे विकास महामंडळातील कार्यकारी संचालकाचे पद रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 07:00 AM2020-11-21T07:00:00+5:302020-11-21T07:00:22+5:30

Irrigation Nagpur News राज्यातील पाचही पाटबंधारे विकास महामंडळातील कार्यकारी संचालकांच्या खुर्च्या रिकाम्या असून प्रभारी अधिकाऱ्यांवर कार्यभार सोपवून वेळ काढणे सुरू आहे.

The post of Executive Director of all the five Irrigation Development Corporations is vacant |  पाचही पाटबंधारे विकास महामंडळातील कार्यकारी संचालकाचे पद रिक्त

 पाचही पाटबंधारे विकास महामंडळातील कार्यकारी संचालकाचे पद रिक्त

Next
ठळक मुद्देसिंचन नियोजनासाठी पूर्णवेळ वरिष्ठ अधिकारीच नाहीतमुख्य अभियंत्यांचीही खुर्ची रिकामी

कमलेश वानखेडे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्याच्या सिंचन विकासाचे नियोजन करण्याची जबाबदारी असलेल्या जलसंपदा खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. राज्यातील पाचही पाटबंधारे विकास महामंडळातील कार्यकारी संचालकांच्या खुर्च्या रिकाम्या असून प्रभारी अधिकाऱ्यांवर कार्यभार सोपवून वेळ काढणे सुरू आहे. विशेष म्हणजे काही प्रभारी अधिकाऱ्यांची निवृत्ती जवळ आली आहे. अशात राज्य सरकारने वेळीच याची दखल घेत सिंचनाचा डोलारा सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांचे नियोजन करण्याची गरज आहे.

विदर्भ सिंचन विकास महामंडळातील कार्यकारी संचालकांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यापासून पद रिक्त आहे. मुख्य अभियंता शेख यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे. मात्र, शेख हे देखील पुढील महिन्यात निवृत्त होत आहेत. याशिवाय नागपुरातील मुख्य अभियंताचे एक व अमरावती येथील दोन पदे रिक्त आहेत. तापी पाटबंधारे सिंचन विकास महामंडळातही चित्र तसेच आहे. जळगाव येथील कार्यकारी संचालकासह मुख्य अभियंत्याचेही पद रिक्त आहे.

कृष्णा खोरे सिंचन विकास महामंडळ, पुणे व कोकण पाटबंधारे विकास महामंडळातही पूर्णवेळ कार्यकारी संचालक नाही. पुणे येथील मुख्य अभियंत्याचे पद रिक्त असून प्रभारीवर काम सुरू आहे तर दुसऱ्या मुख्य अभियंत्याची बदली झाली असून त्यांनी पदभार सोडल्यावर ती खुर्चीही रिकामीच राहणार आहे. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, औरंगाबादलाही पूर्णवेळ कार्यकारी संचालकाची प्रतीक्षा आहे.

Web Title: The post of Executive Director of all the five Irrigation Development Corporations is vacant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.