सुधाकर गायधनी यांच्यावर बिरलॅण्ड देशाचा पोस्टल स्टॅम्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2022 08:50 PM2022-12-06T20:50:39+5:302022-12-06T20:51:22+5:30

Nagpur News आंतरराष्ट्रीय मराठी महाकवी सुधाकर गायधनी यांच्या काव्यक्षेत्रातील जागतिक योगदानाबद्दल स्टेट ऑफ बिरलॅण्ड या देशाने जगातील काही मोजक्या विश्व-प्रसिद्ध साहित्यिकांसोबत एक पाउंड किमतीचा पोस्टल स्टॅम्प काढला आहे.

Postal stamp of Birland country on Mahakavi Gaidhani | सुधाकर गायधनी यांच्यावर बिरलॅण्ड देशाचा पोस्टल स्टॅम्प

सुधाकर गायधनी यांच्यावर बिरलॅण्ड देशाचा पोस्टल स्टॅम्प

googlenewsNext


नागपूर : आंतरराष्ट्रीय मराठी महाकवी सुधाकर गायधनी यांच्या काव्यक्षेत्रातील जागतिक योगदानाबद्दल स्टेट ऑफ बिरलॅण्ड या देशाने जगातील काही मोजक्या विश्व-प्रसिद्ध साहित्यिकांसोबत एक पाउंड किमतीचा पोस्टल स्टॅम्प काढला आहे. या शिवाय, स्टेट ऑफ बिरलॅण्डच्या प्रधानमंत्री प्रिन्सेस एडन त्रिनिदाद यांच्या सांस्कृतिक मंत्रालयाने गायधनी यांची भारतातील महाराष्ट्र प्रदेशाचे सांस्कृतिक संचालक म्हणून निवड केली आहे.

 सिंगापूर येथील सरकारमान्य विश्व कला आणि सांस्कृतिक संघटनेने (एफओडब्ल्यूसीएएएस) गायधनी यांची आंतरराष्ट्रीय मानद सल्लागारपदी नियुक्ती केली आहे. विश्व कवी परिषद मंगोलिया आणि अर्जेंटिना येथील युनेस्को मान्य कल्चरल कानलिमतर्फे त्यांना मानद डी.लिटने सन्मानित करण्यात आले आहे. स्पेनच्या कवयित्री अनाबेल यांनी गायधनींच्या देवदूतचा स्पॅनिश अनुवाद केला असून, तो ग्रंथरूपात प्रकाशित झाला आहे. आजवर जगातील ३४ भाषांमध्ये त्यांच्या कवितांचे अनुवाद झाले आहेत.

..................

Web Title: Postal stamp of Birland country on Mahakavi Gaidhani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.