पदव्युत्तरच्या नोंदणीला २० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:18 AM2021-09-02T04:18:35+5:302021-09-02T04:18:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर प्रवेशाच्या नोंदणीला सुरुवात झाली असून, तांत्रिक गोंधळामुळे विद्यार्थ्यांना ...

Postgraduate registration extended till September 20? | पदव्युत्तरच्या नोंदणीला २० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ ?

पदव्युत्तरच्या नोंदणीला २० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ ?

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर प्रवेशाच्या नोंदणीला सुरुवात झाली असून, तांत्रिक गोंधळामुळे विद्यार्थ्यांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागत आहे. अनेकांची कागदपत्रे ऑनलाइन जमाच झाली नसल्याचा संदेश येत आहे. त्यामुळे विद्यार्थी संभ्रमात आहेत. दरम्यान, पदव्युत्तरच्या नोंदणीला २० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ मिळण्याची दाट शक्यता आहे.

नागपूर विद्यापीठामधील पदव्युत्तर विभागांतील केंद्रीय प्रवेश प्रक्रियेला २७ ऑगस्टपासून सुरुवात झाली. इतर महाविद्यालयांत पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना संकेतस्तळावर ऑनलाइन नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. परंतु अनेकांना यात अडचणी येत आहेत. अनेकांची कागदपत्रे जमा झालेली नसल्याचे दाखवत आहेत. ४ सप्टेंबर ही नोंदणीची अखेरची तारीख आहे. नोंदणीच प्रलंबित दाखवत असल्याने विद्यार्थी तणावात आहेत.

दरम्यान व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीतदेखील या मुद्द्यावर चर्चा झाली. विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेता नोंदणीला मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली. प्रशासनाकडून ही मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे.

Web Title: Postgraduate registration extended till September 20?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.