सायकल दुकाने पाडण्यावर स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 09:27 AM2020-11-22T09:27:11+5:302020-11-22T09:27:11+5:30
वादग्रस्त कारवाईविरुद्ध जगदीशचंद्र ॲण्ड कंपनी व इतर तीन सायकल दुकानदारांनी याचिका दाखल केली आहे. दुकाने शिकस्त झाल्यामुळे ती पाडण्यात ...
वादग्रस्त कारवाईविरुद्ध जगदीशचंद्र ॲण्ड कंपनी व इतर तीन सायकल दुकानदारांनी याचिका दाखल केली आहे. दुकाने शिकस्त झाल्यामुळे ती पाडण्यात यावी अशी नोटीस मनपाने याचिकाकर्त्यांना बजावली आहे. त्यावर याचिकाकर्त्यांचा आक्षेप आहे. दुकानांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले नाही. त्याचा अहवाल उपलब्ध नसल्यामुळे दुकाने शिकस्त झाल्याचा निष्कर्ष काढता येणार नाही. मनपाच्या नोटीसनुसार दुकानांचा केवळ काही भाग शिकस्त झाला आहे. त्यामुळे संपूर्ण दुकाने पाडण्याची गरज नाही. दुकाने शिकस्त दिसतात म्हणून ती पाडणे चुकीचे होईल. दुकानांचे बांधकाम दुरुस्त केले जाऊ शकते असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. कार्तिक शुकुल व ॲड. रोहित चौगुले यांनी कामकाज पाहिले.