मुख्याधिकाऱ्यांना मडके भेट आंदाेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:07 AM2021-07-16T04:07:42+5:302021-07-16T04:07:42+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क हिंगणा : शहरात पाणीटंचाईसह अन्य समस्या निर्माण झाल्या आहेत. याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसच्या ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
हिंगणा : शहरात पाणीटंचाईसह अन्य समस्या निर्माण झाल्या आहेत. याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी (दि. १५) दुपारी हिंगणा नगर पंचायत कार्यालयासमाेर मुख्याधिकाऱ्यांना मडके भेट आंदाेलन केले. शहरातील मूलभूत समस्या साेडविण्यासाठी त्यांनी मुख्याधिकारी राहुल परिहार यांना निवेदनही दिले.
हिंगणा शहरात पिण्याच्या पाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे. पथदिवे दिवसा सुरू असतात आणि रात्री ११ नंतर बंद हाेत असल्याने नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागताे. शहरातील एका माेबाईल सेंटरजवळ पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन लिकेज झाली असून, तिथे पाण्याचा अपव्यय हाेत आहे. डेअरीजवळ तयार केलेल्या पुलाला जीवघेणा उतार तयार केला आहे. शहराच्या विविध भागाच्या दैनंदिन साफसफाईकडे दुर्लक्ष केले जात आहे. कचरा उचलणे व त्याची याेग्य विल्हेवाट लावण्यात दिरंगाई केली जाते. नगर पंचायत प्रशासनाने लावलेल्या झाडांच्या फांद्या विजेच्या तारांना स्पर्श करीत असल्याने शाॅर्ट सर्किट हाेऊन वीजपुरवठा खंडित हाेताे. त्यामुळे या सर्व समस्या तातडीने साेडविण्याची मागणीही मुख्याधिकारी राहुल परिहार यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
यावेळी त्यांनी राहुल परिहार यांना मडके भेट दिले. या आंदाेलनात राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे तालुकाध्यक्ष आशिष पुंड, शहर अध्यक्ष प्रेम सावरकर, सुरेश शेंडे, फिरोज शेख, गिरीधर सावरकर, मंगेश शेंडे, शुभम थोटे, कुणाल चतुर, नितीन लोहकरे, गणेश शेंडे, रजनीकांत नगरारे, योगेश शेंडे, आकाश सातपुते, सूरज उमाटे, रवी उईके यांच्यासह अन्य पदाधिकारी सहभागी झाले हाेते.