थुंकण्यासाठी रेल्वे प्रवाशांना पाऊचची सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 08:38 PM2020-08-27T20:38:50+5:302020-08-27T20:40:36+5:30

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने आता थुंकण्यासाठी एक पाऊच तयार केले आहे. प्रवासादरम्यान इतर कुठेही घाण न करता या पाऊचमध्येच थुंकण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

Pouch facility for railway passengers to spit | थुंकण्यासाठी रेल्वे प्रवाशांना पाऊचची सुविधा

थुंकण्यासाठी रेल्वे प्रवाशांना पाऊचची सुविधा

Next

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने आता थुंकण्यासाठी एक पाऊच तयार केले आहे. प्रवासादरम्यान इतर कुठेही घाण न करता या पाऊचमध्येच थुंकण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे प्रवासादरम्यान अनेकदा या पाऊचचा वापर करता येऊ शकतो. भारतीय रेल्वेत पहिल्यांदाच थुंकीसाठी पाऊचचा वापर करण्यात येणार असल्याने स्वच्छता राखण्यासाठी त्याची मदत होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे पाऊच वरदान ठरणार आहे.
प्रवासादरम्यान प्रवाशांना तासन्तास एकाच बर्थवर बसून रहावे लागते. ज्येष्ठ नागरिक आणि आजारी असलेल्यांना थुंकीसाठी अडचण जाते. प्रवाशांच्या गर्दीतून पुन्हा पुन्हा उठून वॉशरुमपर्यंत जाणे शक्य होत नाही. थुंकी मागच्या खिडकीतील प्रवाशांच्या अंगावर पडते. त्यामुळे बरेचदा वादही होतात. शिवाय संक्रमणाचीही भीती असते. आता मात्र, खिडकीतून बाहेर थुंकण्याची गरज नाही. याकरिता प्रवाशांना केवळ १० रुपये खर्च करावे लागतील. हे पाऊच नागपूर रेल्वे स्थानकावरच मिळेल. या मशीनच्या लोकार्पणाला मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील, सहायक वाणिज्य व्यवस्थापक विजय थूल, वाणिज्य निरीक्षक ताराप्रसाद आचार्य उपस्थित होते.

प्लास्टिकने सामान गुंडाळा अन् निश्चिंत व्हा
नागपूर रेल्वे स्थानकावर कोरोनापासून बचाव करण्यासाठी निर्जंतुकीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे तर दुसरीकडे प्रवाशांचे सामान प्लास्टिकने गुंडाळण्याचीही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासाठी नागपूर रेल्वे स्थानकावर एक केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेशकुमार यांच्या मार्गदर्शनात भारवाहक संघटनेचे अध्यक्ष अब्दुल मजीद यांच्या हस्ते करण्यात आले. या केंद्रात प्रवाशांना आपले सामान प्लास्टिकने गुंडाळता येईल. १० ते १०० रुपयात ही सुविधा प्रवाशांना मिळेल. या पद्धतीमुळे प्रवाशांना दिलासा तर मिळेल शिवाय रेल्वेचा महसूल वाढणार आहे.

Web Title: Pouch facility for railway passengers to spit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.