शिक्षण विभागातील अनुकंपापीडित कुटुंबीयांचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:10 AM2021-09-06T04:10:29+5:302021-09-06T04:10:29+5:30
नागपूर : शिक्षण विभागात अनुकंपावर नियुक्त्या करताना अधिकाऱ्यांकडून पीडितांना वेगवेगळ्या कारणांसाठी त्रास दिला जातोय. शासननिर्णय असतानाही विनाकारण त्रुटी काढून ...
नागपूर : शिक्षण विभागात अनुकंपावर नियुक्त्या करताना अधिकाऱ्यांकडून पीडितांना वेगवेगळ्या कारणांसाठी त्रास दिला जातोय. शासननिर्णय असतानाही विनाकारण त्रुटी काढून उमेदवारांचा छळ केला जातोय. भ्रष्टाचाराशिवाय अनुकंपाच्या नियुक्त्या होत नाहीत, असा आरोप करीत खासगी प्राथमिक शिक्षक संघाने ५ सप्टेंबर रोजी संविधान चौकात शिक्षण विभागातील भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन केले. नागपूर विभागात अनुकंपाच्या १३२ कुटुंबांतील उमेदवारांच्या नियुक्त्या प्रस्तावित आहेत. त्या होत नसल्यामुळे संघटनेच्यावतीने पीडित कुटुंंबांच्या उपस्थितीत आंदोलन केले. आंदोलनात प्रमोद रेवतकर, लोकपाल चापले, ज्ञानेश्वर वाघ, संजय बोरगावकर, रहमतुल्लाह खान, तेजराज राजूरकर, पवन नेटे, प्रमोद कुंभारे, विजय आगरकर, गोपाल मुऱ्हेकर, उग्रसेन देऊळकर, कल्पना काळबांडे, ज्योती सूर्यवंशी, कुुमुद बालपांडे, विद्या मोरे, संदीप सोनकुसरे आदी उपस्थित होते.