बंद दरम्यानही वीज कापण्याची मोहीम सुरूच, महावितरणचे ९ कर्मचारी पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 01:12 AM2021-02-28T01:12:33+5:302021-02-28T01:14:13+5:30

Power cut campaign continues वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी बंद दरम्यानही महावितरणतर्फे थकबाकीदारांची वीज कापण्याची मोहीम सुरूच होती. या मोहिमेतील कर्मचाऱ्यांचा नागरिकांशी थेट संपर्क येतो, त्यामुळे अनेक ठिकाणी याचा विरोधही झाला. दुसरीकडे १६ फेब्रुवारीपासून आतापर्यंत जिल्ह्यात महावितरणचे ९ कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याने या मोहिमेत सामील वीज कर्मचाऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे

The power cut campaign continues even during the shutdown, 9 employees of MSEDCL are positive | बंद दरम्यानही वीज कापण्याची मोहीम सुरूच, महावितरणचे ९ कर्मचारी पॉझिटिव्ह

बंद दरम्यानही वीज कापण्याची मोहीम सुरूच, महावितरणचे ९ कर्मचारी पॉझिटिव्ह

Next
ठळक मुद्देशनिवारीही ७०० थकबाकीदारांची वीज कापली 

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी बंद दरम्यानही महावितरणतर्फे थकबाकीदारांची वीज कापण्याची मोहीम सुरूच होती. या मोहिमेतील कर्मचाऱ्यांचा नागरिकांशी थेट संपर्क येतो, त्यामुळे अनेक ठिकाणी याचा विरोधही झाला. दुसरीकडे १६ फेब्रुवारीपासून आतापर्यंत जिल्ह्यात महावितरणचे ९ कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याने या मोहिमेत सामील वीज कर्मचाऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे; परंतु दबावामुळे त्यांना नाइलाजास्तव काम करावे लागत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

नागपुरात वाढता कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने शनिवार व रविवार या दोन दिवशी बंदचे निर्देश दिले आहेत. अत्यावश्यक सेवा सोडून सर्व व्यवहार बंद ठेवण्यास सांगितले आहे. तसे झालेसुद्धा; परंतु वीज कार्यालय अत्यावश्यक सेवा असल्याने सुरू होते. इतकेच नव्हे तर थकबाकीदारांचे वीज कनेक्शनही कापण्यात आले. जिल्ह्यात शनिवारी जवळपास ७०० थकबाकीदारांची वीज कापण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यात ४०० पेक्षा अधिक कनेक्शन शहरातील तर ३०० ग्रामीणमधील आहेत. यादरम्यान काही ठिकाणी मोहिमेला विरोध करीत बंदच्या दिवशी वीज का कापली जात आहे, असा प्रश्नही नागरिकांनी उपस्थित केला, तसेच १६ ते २६ फेब्रुवारी या दरम्यान जिल्ह्यात महावितरणचे ९ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. शहर सर्कलमधील ४ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यात सोमलवाडा व हुडकेश्वरचे सहायक अभियंत्यांचाही समावेश आहे. यामुळे वीज कर्मचारी दहशतीत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, मोहिमेमुळे ते सुद्धा पॉझिटिव्ह होऊ शकतात. कारण ते थेट नागरिकांच्या संपर्कात येताहेत.

दिशा-निर्देशांचे पालन

अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, ही राज्यव्यापी मोहीम आहे. थकबाकी प्रचंड वाढली आहे. मोहिमेत सहभागी कर्मचाऱ्यांना दोन-दोन कर्मचाऱ्यांचे पथक बनवून जाण्यास सांगण्यात आले आहे. सर्व दिशा-निर्देशांचे पालन केले जात आहे.

Web Title: The power cut campaign continues even during the shutdown, 9 employees of MSEDCL are positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.