नागपूर शहरात वीज कापणे बंद, ग्रामीणमध्ये सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 12:04 AM2021-03-16T00:04:31+5:302021-03-16T00:05:51+5:30

Power cut in Nagpur city stopped लॉकडाऊनमुळे शहरात सोमवारपासून वीज कापण्याची मोहीम महावितरणने बंद केली आहे. ज्या ठिकाणी लॉकडाऊन आहे, तिथे सध्या ही मोहीम बंद आहे.

Power cut in Nagpur city stopped, continue in rural areas | नागपूर शहरात वीज कापणे बंद, ग्रामीणमध्ये सुरू

नागपूर शहरात वीज कापणे बंद, ग्रामीणमध्ये सुरू

Next
ठळक मुद्देएका आठवड्यात ७ हजार लोकांची बत्ती गुल, ४४ कोटींची वसुली

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : लॉकडाऊनमुळे शहरात सोमवारपासून वीज कापण्याची मोहीम महावितरणने बंद केली आहे. ज्या ठिकाणी लॉकडाऊन आहे, तिथे सध्या ही मोहीम बंद आहे. परंतु उर्वरित ग्रामीण भागात मात्र मोहीम सुरू आहे. दरम्यान, या मोहिमेंतर्गत गेल्या आठवडाभरात जिल्ह्यातील ७ हजार घरांची बत्ती गुल करण्यात आली. तर याच महिन्यात आतापर्यंत ४४ कोटी रुपयांची वसुली करण्यात आली.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी थकबाकीच्या वसुलीसाठी वीज कापण्याची मोहीम पुुन्हा सुरू केली जात असल्याची घोषणा करण्यात आली. याअंतर्गत ११ मार्चपासून पुन्हा ही मोहीम सुरु झाली. दरम्यान, लॉकडाऊनमध्ये वीज न कापण्याचे नियम आहेत. त्यामुळे नागपूर शहरात आजपासून वीज कापण्याची मोहीम बंद झाली. नागरिकांनी थकबाकी भरावी, असे आवाहन करण्यात आले आहे. दुसरीकडे ग्रामीण भागात आजही २२५ वीज कनेक्शन कापण्यात आले. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत ४४ कोटी रुपयांची वसुली झाली आहे. विदर्भात ही सर्वाधिक आहे.

मीटर रीडिंग सुरू राहील, बिल वितरणही होणार

गेल्या वर्षी लॉकडाऊन दरम्यान महावितरणने मीटर रीडिंग व बिल वाटप बंद केले होते. परंतु यावेळी लॉकडाऊन दरम्यानही मीटर रीडिंग सुरू राहील. तसेच बिल वाटपही केले जातील. महावितरणने यासंदर्भात मनपा व पोलिसांना यासाठी परवानगी मागण्यात आली होती. ती परवानगी देण्यात आली आहे.

Web Title: Power cut in Nagpur city stopped, continue in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.