उघड्यावर पडले आहे विजेचे तार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:08 AM2021-05-19T04:08:02+5:302021-05-19T04:08:02+5:30

कमल शर्मा नागपूर : शहरातील व्यापारी परिसर असलेल्या केळीबाग रोडवरील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात झाली; परंतु ...

The power line is open | उघड्यावर पडले आहे विजेचे तार

उघड्यावर पडले आहे विजेचे तार

Next

कमल शर्मा

नागपूर : शहरातील व्यापारी परिसर असलेल्या केळीबाग रोडवरील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात झाली; परंतु या बांधकामाच्या प्रक्रियेत जीवघेणे दुर्लक्ष विभागाकडून होत आहे. विजेच्या भूमिगत केबलला काढून न टाकता बांधकामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी विजेचे तार उघड्यावर पडले आहे. हे विद्युत केबल ११ केव्ही (११ हजार वॅट) क्षमतेचे आहे. या दुर्लक्षामुळे मोठी हानी होण्याची शक्यता आहे.

शहीद चौक ते सी.पी.अ‍ॅण्ड बेरार कॉलेज चौक दरम्यानच्या रस्त्याचे रुंदीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येत आहे. त्यासाठी रस्त्याचे खोदकाम करण्यात येत आहे. यात काही ठिकाणी भूमिगत असलेले विजेचे केबल बाहेर आले आहे; परंतु याकडे महावितरण अथवा सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष नाही. या मुख्य लाइनशी जोडलेल्या एल.टी. लाइनचीसुद्धा अशीच अवस्था आहे.

महावितरणने रस्त्याचे काम करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र पाठवून जीवित हानी होऊ शकते, असे संकेत दिले आहेत. महावितरणचे म्हणणे आहे की, विजेच्या केबलला स्थानांतरीत केल्यानंतरच रस्त्याचे खोदकाम करायला हवे होते; परंतु असे झाले नाही. त्यामुळे विजेचे खांब पडले आहेत, तार तुटल्या आहेत, भूमिगत केबल तुटल्या आहेत. पावसाळ्यात पाणी साचल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. रस्त्याच्या कामामुळे विद्युत केबल जेसीबी खाली आले आहे. अद्यापपर्यंत कुठलीही दुर्घटना झाली नसली तरी, परिसरातील वीज पुरवठा सातत्याने खंडित होत आहे.

निष्काळजी इतकी की, विजेचे केबल न काढता त्याच्यावर रस्ता बनविण्यात आला आहे. त्यामुळे विजेचे केबल रस्त्याच्या खाली आले आहे. भविष्यात काही बिघाड झाल्यास रस्त्याचे खोदकाम करावे लागणार आहे. नियमानुसार भूमिगत वीज, पाणी, टेलिफोन लाइनसाठी रस्त्याच्या किनाऱ्यावर नियोजन करावे लागते.

- समस्या गंभीर, लवकरच सोडवू : पीडब्ल्यूडी

सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) चे अभियंता अतुल गोटे यांनी मान्य केले की, समस्या गंभीर आहे. ते म्हणाले की, समस्या तत्काळ सोडविण्यात येईल. उघड्यावर पडलेल्या केबलला झाकण्यात येईल. विभाग रस्त्याच्या बांधकामासंदर्भात सर्व खबरदारी पाळेल.

- विद्युत केबल काढण्याचे इस्टीमेट दिले : महावितरण

महावितरणचे उपकार्यकारी अभियंता प्रसन्ना श्रीवास्तव म्हणाले की, पीडब्ल्यूडीला बरेच पत्र पाठवून समस्येबाबत अवगत केले आहे. बडकस चौक ते सी.पी. अ‍ॅण्ड बेरार कॉलेजपर्यंत टाकण्यात आलेल्या भूमिगत केबल लाइनला स्थानांतरीत करण्यासाठी २४८५७५ रुपयांचे इस्टीमेट तयार करून दिले आहे. बरेच पत्र दिले असतानाही कारवाई झाली नाही.

Web Title: The power line is open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.