थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:11 AM2021-02-26T04:11:34+5:302021-02-26T04:11:34+5:30
अविनाश गजबे लाेकमत न्यूज नेटवर्क माेवाड : काेराेनामुळे उद्याेगधंदे डबघाईस आल्याने तसेच काहींचे राेजगार गेल्याने सामान्य नागरिक आर्थिक संकटात ...
अविनाश गजबे
लाेकमत न्यूज नेटवर्क
माेवाड : काेराेनामुळे उद्याेगधंदे डबघाईस आल्याने तसेच काहींचे राेजगार गेल्याने सामान्य नागरिक आर्थिक संकटात आहेत. याच काळात माेवाड (ता. नरखेड) शहरातील ८१० ग्राहकांकडे घरगुती वापराच्या विजेची बिले थकीत राहिली. त्यातच महावितरण कंपनीने थकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची माेहीम सुरू केली. शहरात एकूण ८१० थकबाकीदारांपैकी १५ ग्राहकांवर वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात आली आहे.
१ एप्रिल २०२० पासून ३१ जानेवारी २०२१ पर्यंत माेवाड शहरातील ८१० ग्राहकांकडे ३५ लाख ८० हजार रुपयांची थकबाकी आहे. या थकबाकीदारांना विजेची बिले भरणे सुकर व्हावे म्हणून त्यांच्याकडील थकीत रकमेचे सुलभ हप्ते करून ते भरण्याची मुभा दिली हाेती. यासाठी थकबाकीदारांवर विलंब आकार शुल्क न आकारएयाचाही निर्णय घेण्यात आला हाेता, अशी माहिती महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली.
या काळात काही थकबाकीदारांनी त्यांच्याकडील विजेची थकीत बिलांचे हप्ते भरायला सुरुवात केली. काहींनी मात्र बिले किंवा हप्ते भरले नाहीत. त्यामुळे त्यांना वीजपुरवठा खंडित करण्याच्या कारवाईला सामाेरे जावे लागले. या ग्राहकांची संख्या १५ असून, ती वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही संघटनांनी या कारवाईला विराेध दर्शविला आहे. त्यांनी वीजपुरवठा खंडित करण्यासाठी येणाऱ्या महावितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना विराेध करण्याचेही आवाहन केले; मात्र काही अपवाद वगळता कुणीही या कारवाईला विराेध करताना दिसून येत नाही.
या कारवाईमुळे नागरिकांमध्ये असंताेष निर्माण हाेत असला तरी कुणीही आंदाेलन अथवा प्रतिकार करायला समाेर येत नाही. या कारवाईला सत्ताधारी पक्षासह विराेधी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे मूक समर्थन असल्याचा आराेपही काही ग्राहकांनी केला आहे. दुसरीकडे, महावितरण कंपनीने वीज दरात वाढ करून बिलांची अवाजवी आकारणी करीत ती बिले वसूल करायला सुरुवात केल्याचा आराेप काही नागरिकांनी केला असून, ही कारवाई थांबविण्याची मागणी केली आहे.
...
५८.१५ लाखाची थकबाकी
माेवाड शहरात एकूण २,०५८ वीज ग्राहक असून, यात ८४ वाणिज्यिक ग्राहक आहेत. थकबाकी रक्कम ही५८ लाख १५ हजार रुपये आहे. यातील ८१० ग्राहकांकडे ३५ लाख ८० हजार रुपयांची तर ४३ ग्राहकांकडे ३ लाख ५० हजार रुपयांची विजेची बिले थकीत आहेत. ही थकबाकी १ एप्रिल २०२० पासून ग्राह्य धरली असून, ८१० थकबाकीदारांपैकी १५ थकबाकीदारंावी वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून वीजबिलापाेटी ५६ हजार रुपये वसूल करण्यात आले. इतर थकबाकीदारांकडून ३५ लाख ८० हजार रुपये येणे बाकी आहे.
...
वीजचाेरी पकडली
थकबाकीदारांकडील वीजपुुरवठा खंडित करीत असतानाच महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना माेवाड शहरात दाेन ठिकाणी वीजचाेरी केली जात असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून १६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ग्राहकांना वीज बिल भरणे सुकर व्हावे म्हणून त्यांना हप्तेवारीची मुभा दिली आहे. महावितरण कंपनी २४ तास वीजपुरवठा करण्यास सक्षम आहे. अडचणी व समस्यांचे निरसन केले जात आहे, अशी प्रतिक्रिया महावितरण कंपनीचे माेवाड येथील कनिष्ठ अभियंता अनिकेत खुंड यांनी व्यक्त केली.