रेल्वे स्थानकावर विजेची नासाडी ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:07 AM2021-07-09T04:07:54+5:302021-07-09T04:07:54+5:30
लाेकमत एक्सक्लूजिव आनंद शर्मा नागपूर : सरकारी कार्यालयात विजेची नासाडी हाेणे जणू सामान्य बाब ठरली आहे. नागपूर रेल्वे स्टेशनवरही ...
लाेकमत एक्सक्लूजिव
आनंद शर्मा
नागपूर : सरकारी कार्यालयात विजेची नासाडी हाेणे जणू सामान्य बाब ठरली आहे. नागपूर रेल्वे स्टेशनवरही अशा प्रकारचे चित्र दिसून येते. रेल्वे स्टेशनच्या मुख्यद्वार परिसरात आरपीएफ पाेलीस स्टेशनच्या बाजूला असलेले तिकीट काऊंटर बंद पडलेले आहे. प्रवाशांची रहदारीही नाही, तरीही दिवसभर या परिसरातील बल्ब आणि पंखे सुरू असतात. यामुळे विजेची नासाडी हाेत आहे. याकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष नाही.
उल्लेखनीय म्हणजे काही वर्षापूर्वी आरपीएफ ठाण्याच्या शेजारी अनारक्षित तिकीट काऊंटर व हाॅल बनविण्यात आला. या जागेहून प्लॅटफार्मकडे जाण्यासाठी रस्ताही बनविण्यात आला. ज्यामुळे प्रवाशांना तिकीट घेऊन स्टेशनकडे जाणे साेपे हाेत हाेते. मात्र काेराेना लाॅकडाऊनमुळे जनरल तिकीट देणे बंदच करण्यात आले आणि प्लॅटफार्मकडे जाणारा मार्गही बंद करण्यात आला. यामुळे प्रवाशांची रहदारीही बंद झाली आहे. असे असताना काऊंटर परिसरातील पंखे व विजेचे बल्ब दिवसभर सुरू असतात. याशिवाय गाड्यांच्या आवागमनासंबंधी डिस्प्ले बाेर्डही सुरूच असताे. या ठिकाणी ठेवलेली ऑटाेमेटेड तिकीट वेंडिंग मशीन (एटीव्हीएम) धूळ खात पडली आहे. या मशीनद्वारे जनरल तिकीट दिले जाते. सध्या जनरल तिकीटवर प्रवासाला परवानगी नसल्याने या मशीनचाही उपयाेग हाेत नाही.
प्रतीक्षा हाॅलमध्ये येतात प्रवासी
आरपीएफ ठाण्याच्या शेजारी जनरल तिकीट काऊंटर आणि प्लॅटफार्मकडे जाणारा मार्ग बंद असला तरी येथे प्रतीक्षा कक्षात प्रवासी येत असल्याने बल्ब आणि पंखे सुरू असतात.
एस.जी. राव, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, नागपूर मंडळ.