नागपुरात बुधवारी अनेक भागातील वीज पुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 08:16 PM2020-07-20T20:16:23+5:302020-07-20T20:18:17+5:30

उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार एकात्मिक रस्ते विकास योजनेंतर्गत रस्त्याच्या मधोमध आलेले वीज खांब हटविण्यात येणार आहे. यासोबतच देखभाल-दुरुस्तीची नियमित कामेही करण्यात येणार असल्याने येत्या बुधवारी शहरातील अनेक भागातील वीज पुरवठा बंद राहणार असल्याचे महावितरणने कळविले आहे.

Power outages in several areas in Nagpur on Wednesday | नागपुरात बुधवारी अनेक भागातील वीज पुरवठा बंद

नागपुरात बुधवारी अनेक भागातील वीज पुरवठा बंद

Next
ठळक मुद्देरस्त्यावरील खांब हटवणार, दुरुस्तीची कामे होणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार एकात्मिक रस्ते विकास योजनेंतर्गत रस्त्याच्या मधोमध आलेले वीज खांब हटविण्यात येणार आहे. यासोबतच देखभाल-दुरुस्तीची नियमित कामेही करण्यात येणार असल्याने येत्या बुधवारी शहरातील अनेक भागातील वीज पुरवठा बंद राहणार असल्याचे महावितरणने कळविले आहे. यादरम्यान महाल आणि गांधीबाग विभाग सर्वाधिक प्रभावित राहतील.
महावितरणनुसार २२ जुलै रोजी सकाळी ८ ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत गांधीबाग डिव्हिजनमधील हरपूरनगर, ताजनगर, आदर्शनगर, गुर्जर कॉलनी, गायत्रीनगर, बगडगंज, रतन कॉलनी, गौसिया कॉलनी, सर्वश्रीनगर, बेलदारनगर, रामकृष्णनगर, गोविंदप्रभुनगर, एमजीनगर, योगेश्वरनगर, जीजामातानगर, म्हाळगीनगर, गंजीपेठ, भालदारपुरा, आर्य समाज मंदिर परिसर, लोहारपुरा, शब्बानी क्लब, तिडके भवन, टाटा पारसी, नटराज चौक, जुनी हिस्लॉप गल्ली आदी ठिकाणी वीज पुरवठा होणार नाही. याच कालावधीत महाल
डिव्हिजनमधील चंद्रमणीनगर, जोशीवाडी, कुकडे ले-आऊट, त्रिशरण चौक, विश्वकर्मानगर, रामेश्वरी, हावरापेठ, द्वारकापुरी, गजानननगर, बाभुळखेडा, पार्वतीनगर, कौशल्यानगर, जयभीमनगर, जोगीनगर, भीमनगर, काशीनगर, रुक्मिणीनगर, रघुजीनगर, म्हाडा सिटी, रेशीमबाग, सिरसपेठ, दक्षिणामूर्ती चौक, बडकस चौक, जलालपुरा, रुईकर रोड, चित्रा टॉकीज, चितारओळी, चिटणीस पार्क या भागात वीज पुरवठा होणार नाही. सकाळी ९.३० ते दुपारी १२ या वेळात भांडेप्लॉट, नंदनवन, मिरे ले-आऊट, बापूनगर, गुरुदेवनगर, ओमनगर, हसनबाग, पांडव महाविद्यालय, महिला महाविद्यालय, उंटखाना, राजधानी हाईट्स, मेडिकल चौक, हनुमाननगर, चंदननगर, राजाबाक्षा, रामबाग, जाटतरोडी, बारा सिंगल, पटेल चौक, अशोकनगर, व्यंकटेशनगर, नंदनवन झोपडपट्टी, राजेंद्रनगर, हसनबाग, संजय गांधीनगर, सद्भावनानगर, दर्शन कॉलनी, अब्बुमियाँनगर, सूरजनगर, तुळशीनगर, अंतुजीनगर, पवनशक्तिनगर, खंडवानीनगर, जानकीनगर, शिवशक्तीनगर, अमरनगर, महाकालीनगर, विठ्ठलनगर, चक्रपाणीनगर येथील वीज पुरवठा बंद राहील.

चिचोली, चनकापूरही प्रभावित
ग्रामीण भागातील सावनेर डिव्हिजन अंतर्गत कळमेश्वर उपविभागातील खापरखेडा वीज लाईनच्या दुरुस्तीचे कामही २२ जुलै रोजी करण्यात येणार आहे. त्यामुळे सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत चिचोली व चनकापूर या गावातील वीज पुरवठा खंडित राहील.

Web Title: Power outages in several areas in Nagpur on Wednesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.