शिवसेनेची शक्ती २८ हजारांवर थांबली

By admin | Published: October 29, 2014 12:41 AM2014-10-29T00:41:19+5:302014-10-29T00:41:19+5:30

युती मोडीत निघाल्याने भाजप-शिवसेनेने विधानसभा निवडणूक स्वबळावर लढविली. शहरातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी पाच ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार उभे होते. परंतु दक्षिण नागपूर

The power of Shivsena stopped at 28 thousand | शिवसेनेची शक्ती २८ हजारांवर थांबली

शिवसेनेची शक्ती २८ हजारांवर थांबली

Next

शहरात पाच उमेदवार : अनामत रक्कमही जप्त
नागपूर : युती मोडीत निघाल्याने भाजप-शिवसेनेने विधानसभा निवडणूक स्वबळावर लढविली. शहरातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी पाच ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार उभे होते. परंतु दक्षिण नागपूर मतदारसंघातील किरण पांडव वगळता शिवसेनेच्या एकाही उमेदवाराला १० हजार मतांचा आकडा ओलांडता आलेला नाही. पश्चिम नागपुरात सेनेच्या उमेदवाराला जेमतेम ११८० मते मिळाली. दक्षिण-पश्चिम मतदारसंघात २७६७ तर मध्य नागपूर मतदारसंघात ३२८१ मतावर समाधान मानावे लागले. शहरात शिवसेनेची शक्ती २८ हजारांवर थांबली
राज्यातील युती संपुष्टात आल्याने विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवारांना याचा जबर फटका बसेल अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु निवडणुकीत असे काही घडले नाही. पश्चिम विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे विकास अंभोरे यांना जेमतेम १८८० मते मिळाली. या मतदारसंघात एकूण २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. शिवसेनेला सहाव्या क्रमांकाची मते मिळाली.
येथे शिवसेनेचा उमेदवार लढतीतच नव्हता. शिवसेनेच्या तुलनेत मनसे व राष्ट्रवादीच्या उमेदवारांना अधिक मते मिळाली आहेत.
दक्षिण-पश्चिम मतदारसंघात शिवसेनेचे पंजू तोतवाणी यांना २७६७ मते मिळाली. निवडणूक प्रचारादरम्यान शिवसेना उमेदवाराला चांगली मते मिळतील असा दावा केला जात होता. परंतु प्रत्यक्षात असे काहीही घडले नाही.
या मतदारसंघात १६ उमेदवार उभे होते. यात तोतवाणी यांना चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. येथे भाजप-काँग्रेस अशी सरळ लढत झाली. यात भाजपचे देवेंद्र फडणवीस यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला.
दक्षिण नागपूर मतदारसंघात शिवसेनेचे किरण पांडव चमत्कार घडवतील अशी अपेक्षा होती. परंतु मोदी लाटेत पांडव यांना पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. त्यांना १२,८६३ मते मिळाली. पूर्व नागपूर मतदारसंघात शिवसेनेचे अजय दलाल निवडणुकीत उभे होते. त्यांना पाचव्या क्रमांकाची ७४८१ मते मिळाली. मध्य नागपूर मतदारसंघातील शिवसेना उमेदवार सतीश हरडे यांना ३२८१ मते मिळाली. त्यांना सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
उत्तर नागपुरात शिवसेनेला सक्षम उमेदवार न मिळाल्याने निवडणुकीत पक्षाचा उमेदवार उभा नव्हता. महापालिक ा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांना जितकी मते मिळाली होती, किमान ही मते सेनेच्या उमेदवारांना मिळतील अशी अपेक्षा होती परंतु प्रत्यक्षात असे घडले नाही. (प्रतिनिधी)

Web Title: The power of Shivsena stopped at 28 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.