७० गावांचा वीज पुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:09 AM2021-05-11T04:09:35+5:302021-05-11T04:09:35+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कुही : तालुक्यातील काही भागात साेमवारी (दि. १०) सायंकाळी वादळ वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या जाेरदार सरी बरसल्या. ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कुही : तालुक्यातील काही भागात साेमवारी (दि. १०) सायंकाळी वादळ वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या जाेरदार सरी बरसल्या. त्यामुळे तालुक्यातील ७० गावांमधील वीज पुरवठा खंडित झाला हाेता. शिवाय, वादळ व पावसामुळे आंबा व चिकुचे नुकसान झाले.
तालुक्यातील काही गावांमध्ये साेमवारी सायंकाळी वादळासह पावसाला सुरुवात झाली. काही भागात बाेराच्या आकाराची गारपीटही झाली. अंदाजे ३५ ते ४५ मिनिटे पावसाचा जाेर कायम हाेता. या वादळामुळे विजेचे खांब उन्मळून पडल्याने तसेच काही खांब वाकल्याने, विजेच्या तारा तुटल्याने या वादळाचा सर्वाधिक फटका महावितरण कंपनीला बसला. विजेच्या तारा तुटल्याने आंभोरा, वेलतूर व राजोला परिसरातील एकूण ७० गावांमधील वीज पुरवठा खंडित झाला हाेता. त्यामुळे अर्धा अधिक कुही तालुका अंधारात हाेता.
महावितरण कंपनीचे कुही येथील उपविभागीय अभियंता रंधये यांच्या मार्गदर्शनात रात्री उशिरापर्यंत या भागातील वीज पुरवठा सुरळीत करण्याचे कार्य युद्धपातळीवर सुरू हाेते. तालुक्यात काही गावांमध्ये आंबा व चिकुच्या बागा आहेत. वादळ व गारपिटीमुळे या दाेन्ही फळांचे माेठे नुकसान झाले आहे. दरम्यान, तालुक्यात कुठेही वीज काेसळून प्राणहानी झाल्याचे वृत्त नाही.