वातावरण बदलले की वीज पुरवठा खंडित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 01:19 AM2020-09-24T01:19:02+5:302020-09-24T01:20:34+5:30

वातावरणात बदल झाल्याने वीज पुरवठा खंडित होणे सामान्य बाब झाली आहे. शहराची वीज वितरण व्यवस्था हलक्याफुलक्या पावसालाही सहन करू शकत नसल्याचे दिसते आहे. विशेष म्हणजे कंपनी दर आठवड्याला मेंटेनन्सच्या नावावर तासन्तास वीज पुरवठा खंडित ठेवते. वीज पुरवठा खंडित झाल्याने त्याचा फटका ऑनलाईन अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना बसतो आहे.

Power supply cut off when climate changes! | वातावरण बदलले की वीज पुरवठा खंडित!

वातावरण बदलले की वीज पुरवठा खंडित!

Next
ठळक मुद्देमहावितरणच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह : ऑनलाईन अभ्यासासाठी होतेय अडचण

लोकमत  न्यूज  नेटवर्क 
नागपूर : वातावरणात बदल झाल्याने वीज पुरवठा खंडित होणे सामान्य बाब झाली आहे. शहराची वीज वितरण व्यवस्था हलक्याफुलक्या पावसालाही सहन करू शकत नसल्याचे दिसते आहे. विशेष म्हणजे कंपनी दर आठवड्याला मेंटेनन्सच्या नावावर तासन्तास वीज पुरवठा खंडित ठेवते. वीज पुरवठा खंडित झाल्याने त्याचा फटका ऑनलाईन अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना बसतो आहे.
बुधवारी वीज खंडित झाल्याचा फटका बुटीबोरीतील लोकांनादेखील बसला. दुपारी २.२० वाजता वीज गेली आणि रात्री ७.३० ला आली. कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या मते वातावरण बदल झाल्याने असे घडले आहे. एका हॉटेल जवळ ३ इन्सुलेटर डिस्क फुटले. चौकातसुद्धा एक इन्सुलेटर डिस्क फुटली. काही दिवसांपूर्वी पावसामुळे इन्सुलेटरचे नुकसान झाल्याने बराच वेळ वीज खंडित झाली होती. परंतु महावितरणच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आहे. लोकांचे म्हणणे आहे की, ग्रामीण भागात कंपनीचे लक्ष नाही. सर्व कारभार रामभरोसे सुरू आहे. यासंदर्भात कंपनीने वातावरणातील बदलाचे कारण सांगून हात वर केले. त्यांचे म्हणणे आहे की पाऊस जोरदार झाला. वीजसुद्धा कोसळली. कंपनीने तात्काळ दुरूस्तीचे काम सुरू केले आहे.

Web Title: Power supply cut off when climate changes!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.