कोविड रुग्णालयाच्या वीज पुरवठ्याची होणार तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:07 AM2021-04-24T04:07:27+5:302021-04-24T04:07:27+5:30
नागपूर : संपूर्ण राज्यात कोविड रुग्णालयात लागणाऱ्या आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आता महावितरण सतर्क झाली आहे. कंपनीने रुग्णालयातील वीज पुरवठ्याची ...
नागपूर : संपूर्ण राज्यात कोविड रुग्णालयात लागणाऱ्या आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आता महावितरण सतर्क झाली आहे. कंपनीने रुग्णालयातील वीज पुरवठ्याची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत सर्व रुग्णालयाची तपासणी करून वीज वितरण प्रणालीने कोणतीही घटना होणार नाही, हे सुनिश्चित करण्यात येणार आहे.
महावितरणचे संचालक (परिचालन) अरविंद भादीकर यांनी शुक्रवारी कंपनीचे सर्व मुख्य अभियंता आणि अधीक्षक अभियंत्यांना या संदर्भात आदेश जारी केला आहे. त्यांच्यानुसार हे काम तातडीने सुरू करून एका आठवड्यात पूर्ण करायचे आहे. त्याअंतर्गत कंपनीचे अभियंता रुग्णालयांपर्यंत विजेचा पुरवठा करणाऱ्या उपकरणांची आणि केबल, फ्यूज, एमसीबी, अर्थिंग आदींची तपासणी करतील. फीडर पिलर, ट्रान्सफॉर्मर, जम्पर आदी दुरुस्त करण्यात येतील. त्यामुळे व्होल्टेजची समस्या येणार नाही. तपासणीदरम्यान काही त्रुटी आढळून आल्यास त्या तत्काळ दूर करण्यात येणार आहे. भादीकर यांच्यानुसार हे काम तातडीने सुरू करण्यात येणार आहे. एका आठवड्यात राज्यातील सर्व रुग्णालयांच्या वीज पुरवठा व्यवस्थेची तपासणी करण्यात येईल.