वडगाव धरणाचा वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:12 AM2021-09-06T04:12:04+5:302021-09-06T04:12:04+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क बेला : दाेन महिन्यांपासून विजेचे बिल थकीत असल्याने महावितरण कंपनीने रविवारी (दि. ५) दुपारी उमरड तालुक्यातील ...

Power supply to Wadgaon dam cut off | वडगाव धरणाचा वीजपुरवठा खंडित

वडगाव धरणाचा वीजपुरवठा खंडित

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

बेला : दाेन महिन्यांपासून विजेचे बिल थकीत असल्याने महावितरण कंपनीने रविवारी (दि. ५) दुपारी उमरड तालुक्यातील वणा नदीवरील निम्न वणा (वडगाव) धरणाचा वीजपुरवठा खंडित केला. त्यामुळे या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना विविध समस्यांना ताेंड द्यावे लागणार आहे.

या धरणाच्या ५०० मीटर परिसरात विजेचे दिवे लावण्यात आले असून, ते रात्रीच्या वेळी सुरू असतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी आपत्कालीन परिस्थितीत कर्मचाऱ्यांना धरणाचे गेट उघडणे साेयीचे जाते. या कार्यालयाला जून महिन्याचे १० हजार ५४० रुपये, तर जुलै महिन्याचे १० हजार ५४० रुपये बिल असून, एकूण २१ हजार ८० रुपयांचे विजेचे बिल देण्यात आले. धरण प्रशासनाने बिलाची रक्कम न भरल्याने महावितरण कंपनीने नाेटीस बजावली. ही बाब गांभीर्याने घेतली नाही. त्यामुळे शेवटी महावितरण कंपनीच्या बुटीबाेरी कार्यालयाने रविवारी या कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली.

सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा ११० टक्के पाऊस काेसळण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. सन २०१७ मध्ये १० टक्के जलसाठा असलेले हे धरण दिवसभराच्या पावसामुळे १०० टक्के भरले हाेते. त्यादिवशी नागपूर जिल्ह्यात ३०० मिमी पावसाची नाेंद करण्यात आली हाेती. त्यावेळी येथील जेनरेटरमध्ये बिघाड निर्माण झाला हाेता, तर वीजपुरवठाही खंडित झाला हाेता. ताे प्रसंग आठवला की उरात धडकी भरत असल्याचेही येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले.

या धरणाच्या परिसरात चिखल तयार झाला आहे. याच चिखलामुळे एक कर्मचारी पडल्याने नुकताच जखमी झाला. या सर्व बाबी लक्षात घेता विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालक व अभियंत्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणीही या परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

...

वार्षिक दाेन काेटींचे उत्पन्न

निम्न वणा हे नागपूर जिल्ह्यात सर्वांत माेठे धरण असून, याला २१ गेट आहेत. १०० हेक्टरमध्ये विस्तारलेल्या या धरणाची पाणी साठवण क्षमता १३६ दलघमी असून, यात सध्या ९० टक्के पाणीसाठा आहे. या धरणातील पाणी नागपूर शहरातील मिहान व इतर कंपन्यांना तसेच सिंचनाला दिले जाते. या पाणीकरातून जलसंपदा विभागाला दरवर्षी दाेन काेटी रुपयांचे उत्पन्न मिळते.

...

डिझेलसाठी पैसे आणायचे कुठून?

वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने येथे राहणाऱ्या जलसंपदा विभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भागात सरपटणाऱ्या प्राणी व विषारी कीटकांचा वावर आहे. धरणावर जेनरेटरची सुविधा आहे; पण त्याला दर तासाला १८ लिटर म्हणजेच रात्रभर २१६ लिटर डिझेलची आवश्यकता आहे. डिझेल खरेदी करण्यासाठी २० हजार रुपये आणायचे कुठून, असा प्रश्नही कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला.

...

काेराेना संक्रमणामुळे पाणीकराची रक्कम मिळाली नाही. आता केवळ २५ हजार रुपयांची वसुली झाली आहे. ही रक्कम थेट देता येत नाही. त्यामुळे विजेचे बिल या आठवड्यात भरले जाईल. धरणावर जेनरेटरची व्यवस्था आहे.

- राजेश हुमणे, कार्यकारी अभियंता,

निम्न वणा, प्रकल्प.

...

वीज बिल भरण्याची वरिष्ठ कार्यालयाला वारंवार मागणी बिल पाठवून रकमेची मागणी करण्यात आली. परंतु, उपयाेग झाला नाही.

- हेमंत कुळकर्णी, कनिष्ठ अभियंता,

निम्न वणा, प्रकल्प.

...

Web Title: Power supply to Wadgaon dam cut off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.