आकोडा टाकून विजेची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:07 AM2021-07-22T04:07:16+5:302021-07-22T04:07:16+5:30

- ग्राहकाच्या विरोधात प्रकरणाची नोंद नागपूर : विजेचे बिल भरले नसल्याने कनेक्शन कापल्यानंतर ग्राहक आकोडा टाकून अवैधरीत्या विजेचा वापर ...

Power theft by throwing Akoda | आकोडा टाकून विजेची चोरी

आकोडा टाकून विजेची चोरी

googlenewsNext

- ग्राहकाच्या विरोधात प्रकरणाची नोंद

नागपूर : विजेचे बिल भरले नसल्याने कनेक्शन कापल्यानंतर ग्राहक आकोडा टाकून अवैधरीत्या विजेचा वापर करत होता. महावितरणच्या वसुली मोहिमेंतर्गत हे प्रकरण उघडकीस आले. संबंधित ग्राहकाच्या विरोधात कळमना पोलीस ठाण्यात वीज चोरीचे प्रकरण नोंदविण्यात आले आहे.

महावितरणचे कार्यकारी अभियंता राहुल जीवतोडे व अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रशांत भाजीपाले यांच्या निर्देशानुसार सहायक अभियंता अक्षय कोंबाडे व त्यांचे पथक बेलेनगर, कामनानगर परिसरात शिल्लक बिल वसुलीच्या मोहिमेवर होते. याच परिसरातील ग्राहक अतिक सिद्दीकीचे वीज बिल २.२३ लाख रुपये पेंडिंग होते. ते भरले नसल्याने त्याच्या घरचे वीज कनेक्शन मार्चमध्ये कापण्यात आले. त्यानंतर त्याने नरगिस नावाच्या महिलेच्या मदतीने विजेच्या लाईनवर आकोडा टाकून वीज चोरी करण्यास सुरुवात केली. कोंबाडे यांना मोहिमेदरम्यान या प्रकरणाची माहिती मिळाली. त्यांनी या प्रकरणाची तक्रार कळमना पोलीस ठाण्यात केली. तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी अतिक सिद्दीकी व नरगिसच्या विरोधात वीज चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. नागरिकांनी वीज कापल्यावर कोणत्याही परिस्थितीत आकोडा टाकून वीज चोरी करू नये अन्यथा त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा महावितरणचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी यावेळी दिला आहे.

......

Web Title: Power theft by throwing Akoda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.