प्राची केशन शहरात टॉप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 01:58 AM2017-07-19T01:58:05+5:302017-07-19T01:58:05+5:30
‘आयसीएआय’तर्फे (इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाऊंटंट्स आॅफ इंडिया) मंगळवारी दुपारी ‘सीए’ अंतिमचे निकाल जाहीर करण्यात आले.
‘सीए’ अंतिमचा निकाल जाहीर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘आयसीएआय’तर्फे (इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाऊंटंट्स आॅफ इंडिया) मंगळवारी दुपारी ‘सीए’ अंतिमचे निकाल जाहीर करण्यात आले. शहरातील प्राची केशन हिने शहरातून अव्वल स्थान पटकाविले. अखिल भारतीय पातळीवर तिचा २३ वा क्रमांक आहे. तिला ६८.८८ टक्के गुण प्राप्त झाले. निकालांमध्ये यंदादेखील विद्यार्थिनींनीच बाजी मारली आहे. प्राचीपाठोपाठ प्रियल सारडा हिने ६१.२५ टक्क्यांसह
दुसरे स्थान मिळविले. तिला ६०.७५ टक्के गुण मिळाले तर विकास जंगाले याने ६०.७५ टक्के गुणांसह तिसरा क्रमांक मिळविला. मे महिन्यात ही परीक्षा घेण्यात आली होती. देशभरातील ३६८ केंद्रांवर तसेच विदेशातील ४ केंद्रांवर परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. जूनमध्ये घेण्यात आलेल्या ‘सीपीटी’चे (कॉमन प्रोफिशिएन्सी टेस्ट)चा निकालदेखील जाहीर करण्यात आला.