प्रधानमंत्री आवास योजनेतून नागपूर ग्रामीण भागात ४ लाख २१ हजार घरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 11:43 PM2019-08-05T23:43:02+5:302019-08-05T23:44:48+5:30
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत राज्यात आतापर्यंत ५ लाख ७८ हजार १०९ लाभार्थींना घरे मंजूर करण्यात आली असून त्यापैकी ४ लाख २१ हजार ३२९ घरे बांधण्यात आली आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत राज्यात आतापर्यंत ५ लाख ७८ हजार १०९ लाभार्थींना घरे मंजूर करण्यात आली असून त्यापैकी ४ लाख २१ हजार ३२९ घरे बांधण्यात आली आहेत.
प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून १० लाख ५१ हजार ९० लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. ग्रामविकास विभागामार्फत प्रधानमंत्री आवास योजनेशिवाय रमाई, शबरी, आदीम, पारधी इत्यादी राज्य पुरस्कृत घरकुल योजनांच्याही अंमलबजावणीला गती देण्यात आली आहे. सर्वांसाठी घरे या धोरणांतर्गत २०२२ पर्यंत निवारा उपलब्ध करून देण्याचे ध्येय ठरविण्यात आले आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेतून ग्रामीण भागात मंजूर करण्यात आलेल्या ७७ टक्के घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे. मागील पाच वर्षात ग्रामीण भागात यासाठी ११ हजार १५६ कोटी रुपये खर्च झाले आहेत. पूर्वी या योजनेतून देण्यात येणारे ९५ हजार रुपयांचे अनुदान वाढवून आता १ लाख ५० हजार रुपये इतके करण्यात आले आहे. केंद्र शासनाकडून महाराष्ट्राला नुकतेच २ लाख ८६ हजार इतके नवीन उद्दिष्ट मिळाले आहे.