कृषी प्रक्रिया पंधरवाड्यानिमित्त प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रियेवर कार्यशाळा
By गणेश हुड | Published: August 17, 2023 03:58 PM2023-08-17T15:58:21+5:302023-08-17T16:01:38+5:30
कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली
नागपूर : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेंतर्गत कृषी प्रक्रिया पंधरवाड्या निमित्त कदीमबाग येथील शेतकरी प्रशिक्षण सभागृहात सोमवारी जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. यात कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविंद्र मनोहरे यांचे अध्यक्षतेखाली आयोजित कार्यशाळेचे उद्घाटन प्रकल्प संचालक आत्मा डॉ. अर्चना कडू यांनी केले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून बँक ऑफ इंडियाचे जिल्हा अग्रणी व्यवस्थापक मोहित गेडाम, महाराष्ट्र राज्य जीवन्नोती प्रकल्प (उमेद)चे जिल्हा अभियान व्यवस्थापक शेखर गजभिये, कृषी महाविद्यालयाच्या शास्त्रज्ञ डॉ. बडगे, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे केंद्र प्रमुख डॉ. हेमंत गजभिये, माविमच्या सनियंत्रण अधिकारी प्रतिभा फाटे, स्टेट बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय अधिकारी गोवर्धन पराते, एनयुएलएमचे प्रतिनिधी वसंत मेश्राम, उपविभागीय कृषी अधिकारी अरुण कुसळकर यांच्यासह तालुका स्तरावरील कृषी अधिकारी उपस्थित होते.