प्रदीप आगलावे बौद्ध साहित्य संमेलनाचे उद्घाटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 12:11 AM2019-05-18T00:11:20+5:302019-05-18T00:12:56+5:30
तथागत बुद्ध यांच्या जयंतीच्या पर्वावर ठाणे येथील भदंत आनंद कौशल्यायन साहित्य नगरीत येत्या १९ व २० मे रोजी राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून ज्येष्ठ विचारवंत व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. आंबेडकर विचारधारा विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. प्रदीप आगलावे यांची निवड करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तथागत बुद्ध यांच्या जयंतीच्या पर्वावर ठाणे येथील भदंत आनंद कौशल्यायन साहित्य नगरीत येत्या १९ व २० मे रोजी राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून ज्येष्ठ विचारवंत व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. आंबेडकर विचारधारा विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. प्रदीप आगलावे यांची निवड करण्यात आली आहे. संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ साहित्यिक प्रा. शुक्राचार्य गायकवाड हे भूषवणार आहेत. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर, ज्येष्ठ साहित्यिक ऊर्मिला पवार, बबनराव कांबळे, प्रा. इंदिरा आठवले प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. या संमेलनादरम्यान ‘बौद्ध धम्माची स्थिती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रांती’, ‘बुद्धाचा सौंदर्यविषयक दृष्टिकोन’, ‘प्रबोधन आणि आचराणातून धम्मविचार’ या विषयांवर परिसंवाद होतील. याशिवाय ‘बौद्ध धम्म प्रचार प्रसारामध्ये साहित्यिकांची भूमिका’, ‘पाली साहित्यातील थेरीगाथा’, ‘बौद्ध धम्माचे प्रश्न आणि साहित्यिकांची भूमिका’ या विषयावर चर्चासत्र तसेच दोन कविसंमेलन आणि कथाकथन होईल.