शेतकऱ्यांच्या जमीन लिलावाविरोधात प्रहार आक्रमक; बच्चू कडूंसह कार्यकर्त्यांची जिल्हा बँकेवर धडक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 12:49 PM2023-02-21T12:49:36+5:302023-02-21T12:59:34+5:30
बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचं नागपुरात आंदोलन
नागपूर : शेतकऱ्यांच्या जमीनीच्या लिलावाबद्दलची प्रक्रिया थांबवा, या मागणीसाठी बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्तीने पक्षाने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात पक्षाने आंदोलन सुरू केले आहे.
नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून थकबाकीदार शेतकऱ्यांच्या जमिनीच्या लिलावासंदर्भातली तहकूब केलेली प्रक्रिया आता पुन्हा सुरू करण्यात आली आहे. नागपूर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना बँकेच्या वसुली अधिकाऱ्यांकडून लिलावासंदर्भातली नोटीस बजावण्यात आली असून याविरोधात प्रहारचे नेते आक्रमक झाले आहेत. बच्चू कडू यांच्या नेतृत्वार प्रहार जनशक्तीने आक्रमक भूमिका घेत जिल्हा मध्यवर्ती बँकेवर धडक देत आंदोलन सुरू केले आहे.