प्रकाश बेतावार यांना ‘गुरु गौरव’ तर नितीन काळबांडे यांना ‘कला सन्मान’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:08 AM2021-09-25T04:08:03+5:302021-09-25T04:08:03+5:30
नागपूर : नागपूरचे प्रसिद्ध चित्रकार व रांगोळी कलाकार प्रकाश बेतावार यांना आर्ट बिट्स फाऊंडेशन, पुणेच्यावतीने ‘गुरू गौरव’ तर दिग्दर्शक ...
नागपूर : नागपूरचे प्रसिद्ध चित्रकार व रांगोळी कलाकार प्रकाश बेतावार यांना आर्ट बिट्स फाऊंडेशन, पुणेच्यावतीने ‘गुरू गौरव’ तर दिग्दर्शक नितीन काळबांडे यांना ‘कला सन्मान’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
प्रकाश बेतावार हे व्यवसायाने इंटिरियर डिझायनर असून, उत्तम चित्रकार व रांगोळी कलाकार आहेत. त्यांच्या कलाकौशल्याचे मुंबई, दिल्ली, कोलकाता, भोपाळ, उत्तराखंड, व्हिएतनाम येथे प्रदर्शन सादर झाले आहेत. सहा हजार चौ. फुटांवर काढलेली रांगोळी गिनिज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवली गेली आहे. त्यांना विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. चित्रकार, लेखक व दिग्दर्शक असलेले नितीन काळबांडे यांनी अतिशय प्रतिकुल परिस्थितीतून चित्रकला, चित्रपट दिग्दर्शनाचे शिक्षण घेतले आहे. चित्रपट क्षेत्रात ते असोसिएट कलादिग्दर्शक म्हणून कार्य करत आहेत. त्यांच्या ‘स्वल्पविराम’ या माहितीपटाला ११व्या दादासाहेब फाळके चित्रपट महोत्सवात ‘बेस्ट एडिटिंग’चा पुरस्कार प्राप्त झाला आहे. यासोबतच ‘स्पर्श’ या लघुपटालाही पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
..............