नागपुरातील ज्येष्ठ चित्रकार प्रकाश कावळे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 02:00 PM2018-09-19T14:00:44+5:302018-09-19T14:06:13+5:30

शासकीय चित्रकला महाविद्यालयातील अप्लाईड आर्टसचे सेवानिवृत्त प्राध्यापक प्रकाश कावळे यांचे बुधवारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.

Prakash Kawale, a senior painter from Nagpur, passed away | नागपुरातील ज्येष्ठ चित्रकार प्रकाश कावळे यांचे निधन

नागपुरातील ज्येष्ठ चित्रकार प्रकाश कावळे यांचे निधन

Next
ठळक मुद्देसर्वात कमी वयाचे प्राध्यापक म्हणून नोंदविद्यार्थ्यांचे लाडके सर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: शासकीय चित्रकला महाविद्यालयातील अप्लाईड आर्टसचे सेवानिवृत्त प्राध्यापक प्रकाश कावळे यांचे बुधवारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते. चित्रकलेच्या क्षेत्रातील एक लोकप्रिय व्यक्तिमत्व अशी त्यांची ख्याती होती. वयाच्या २० व्या वर्षीच ते प्रोफेसर म्हणून रुजू झाले. आपल्याच वयोगटातले प्रोफेसर असल्याने विद्यार्थ्यांमध्ये ते अतिशय लोकप्रिय होते.  लँडस्केप हा त्यांच्या आवडीचा विषय होता. त्यांचा लोकमत वृत्तपत्राशी निकटचा संबंध होता. लोकमतच्या साहित्यजत्रा या रविवार पुरवणीसाठी त्यांनी अनेकदा चित्रे दिली आहेत. तसेच जवाहरलाल दर्डा कला अकादमीचेही ते सदस्य होते. त्यांच्या निधनाने आपण एक चांगला व्यक्ती व जवळचा मित्र गमावला असल्याची संवेदना बसोली ग्रूपचे संस्थापक व ज्येष्ठ चित्रकार चंद्रकांत चन्ने यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Prakash Kawale, a senior painter from Nagpur, passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Deathमृत्यू