National Inter-Religious Conference: “भारत महासत्ता होण्याच्या मार्गावर, विश्वगुरू होऊन शांतता प्रस्थापित करण्यास सक्षम”: प्रल्हाद वामनराव पै

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 02:26 PM2021-10-24T14:26:43+5:302021-10-24T14:28:04+5:30

National Inter-Religious Conference: भारताकडे विश्वगुरू बनण्याची ताकद असून, विश्वात शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत सक्षम आहे, असे प्रतिपादन प्रल्हाद वामनराव पै यांनी केले.

pralhad wamanrao pai said india has power to establish peace in world at national inter religious conference | National Inter-Religious Conference: “भारत महासत्ता होण्याच्या मार्गावर, विश्वगुरू होऊन शांतता प्रस्थापित करण्यास सक्षम”: प्रल्हाद वामनराव पै

National Inter-Religious Conference: “भारत महासत्ता होण्याच्या मार्गावर, विश्वगुरू होऊन शांतता प्रस्थापित करण्यास सक्षम”: प्रल्हाद वामनराव पै

Next

नागपूर: भारत हा देश महासत्ता होण्याच्या मार्गावर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) असतील, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) असतील तसेच देशातील अन्य नेते असतील सर्वजण विकासाच्या मागे लागलेला आहे. त्यामुळे भारत महासत्ता होऊ शकतो. तसेच भारताकडे विश्वगुरू बनण्याची ताकद असून, विश्वात शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत सक्षम आहे, असे प्रतिपादन जीवनविद्या मिशनचे संस्थापक प्रल्हाद वामनराव पै (Pralhad Wamanrao Pai) यांनी केले. ‘लोकमत’ वृत्तपत्रसमूहाच्या नागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त नागपुरात आयोजित राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदेत (National Inter-Religious Conference) ते बोलत होते.  

भारत महासत्ता झाला की, आपल्या शब्दाला जगामध्ये वजन येईल. शेवटी तुम्ही मोठे होता, तेव्हाच तुमच्या शब्दाला किंमत आणि वजन येते. संपूर्ण विश्वात शांतता, सुख आणि समाधान आपण पोहोचवण्यास भारत देश कारणीभूत होईल, असा विश्वास प्रल्हाद पै यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. परंतु, केवळ मी सुखी, मी सुखी म्हणून कोणीही सुखी होऊ शकत नाही. जग सुखी तेव्हा मी सुखी, ही वैचारिक क्रांती होईल, तेव्हाच कम्युनल हार्मनीचा प्रश्न सुटण्यास वेळ लागणार नाही आणि हाच संदेश सद्गुरु वामनराव पै यांनी आपल्या सिद्धांतामध्ये दिला आहे, असे प्रल्हाद पै यांनी सांगितले. 

जीवनविद्या हे शास्त्रही आहे आणि कलाही

सद्गुरु वामनराव पै यांचे विचार आचरणात आणले, तर सांप्रदायिक सामंजस्य, सलोखा निर्माण केला जाऊ शकतो. जीवनविद्या म्हणजे काय तर जग सुखी व्हावे. जीवनविद्या हे शास्त्रही आहे आणि कलाही आहे. जीवनविद्येतील सिद्धांताचा मूळ पाया ऋषीमुनी, संतांची शिकवण असली तरी निसर्ग नियमांची जोड सद्गुरुंनी दिली आहे. सत्याची जाणीव समजून घेतली, तर सांप्रदायिक सलोख्याचा प्रश्न सुटेल, असे नमूद करत कर्मसिद्धांतामध्ये क्रिया आणि प्रतिक्रियेला खूप महत्त्व आहे. जशी तुम्ही क्रिया कराल, तशी प्रतिक्रिया उमटते. याचाच अर्थ असा की, सुख आणि दुःख जसे तुम्ही इतरांना द्याल, अगदी तसेच ते बुमरँग होऊन सहस्रपटीने तुमच्याकडे येईल. ही गोष्ट सर्वांना समजली, तर प्रत्येक जण क्रिया-प्रतिक्रिया देताना विचार करेल. हा साधा निसर्ग नियम असून, तो धर्मातीत आहे, असे प्रल्हाद पै यांनी स्पष्ट केले.

प्रत्येक धर्माचा आत्मा हा माणुसकी आहे

मी एकटा सुखी होऊ शकत नाही. माझे सुख इतरांच्या सुखात दडलेले आहे. स्वतःला सुखी व्हायचे असेल, तर इतरांच्या सुख देणे, इतरांच्या सुखाचा विचार करणे गरजेचे असून, हाच सद्गुरुंचा सिद्धांत आहे आणि तो तितकाच महत्त्वाचाही आहे. प्रत्येक धर्माचा आत्मा हा माणुसकी आहे. माणसाने माणसाबरोबर माणसासारखे वागून माणसाला सुखी करण्याचा प्रयत्न करणे हे महत्त्वाचे असून, हीच देवपूजा, भक्ती आणि उपासना असल्याचे सद्गुरु सांगतात. योगगुरू बाबा रामदेव म्हणाले ते खरे आहे, मानवता हाच धर्म आहे. मानव धर्म महत्त्वाचा असून, बाकी सगळे पंथ, संप्रदाय होऊ शकतात, असे प्रल्हाद पै यांनी नमूद केले. 

भारत युवा देश, पिढी घडवणे महत्त्वाचे

मानवी संस्कृतीची मूल्ये, विचार आणि संस्कार लहानपणापासून द्यायला सुरुवात केली पाहिजे. पंतप्रधान मोदी नेहमी सांगतात की, आपला देश युवा देश आहे. आपल्याकडे बहुतांश युवा पिढी आहे आणि हीच युवा पिढी घडवणे महत्त्वाचे आहे. युवा पिढी बिघडली, तर काही खरे नाही. यासाठीच निसर्ग नियमांवर आधारित समता, सभ्यता, सामंजस्य, सहिष्णुता, समाधान, कृतज्ञता ही जीवनमूल्य अधिकाधिक युवा पिढीपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे, असे सांगत आम्ही आमच्या जीवनविद्येमध्ये मुलांमध्ये लहानपणापासूनच ती मूल्ये रुजवण्याचा प्रयत्न करतो, अगदी गर्भसंस्कारापासून त्याची सुरुवात केली जाते. लहानपणापासून जीवनमूल्ये, संस्कार आणि विचार दिला, तर पुढे जाऊन कम्युनल हार्मनीचा विषय लवकर सुटेल, असा विश्वास पल्हाद वामनराव पै यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. 
 

Web Title: pralhad wamanrao pai said india has power to establish peace in world at national inter religious conference

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.