नागपूरच्या प्रशांत नासेरीचा पुण्यात विक्रम

By admin | Published: May 4, 2017 02:09 AM2017-05-04T02:09:16+5:302017-05-04T02:09:16+5:30

सुप्रसिद्ध पार्श्वगायक किशोरकुमार यांनी गायलेल्या मुसाफिर हूँ यारो... तेरे चेहरे में वो जादू है... ये शाम मस्तानी...

Prashant Nasseri of Nagpur records Vikram in Pune | नागपूरच्या प्रशांत नासेरीचा पुण्यात विक्रम

नागपूरच्या प्रशांत नासेरीचा पुण्यात विक्रम

Next

‘हरफनमौला’ला रसिकांची दाद: गायिली १७ तास गाणी
नागपूर:सुप्रसिद्ध पार्श्वगायक किशोरकुमार यांनी गायलेल्या मुसाफिर हूँ यारो... तेरे चेहरे में वो जादू है... ये शाम मस्तानी... कोरा कागज था ये मन मैरा... नदियाँ से दरीयाँ... अशी अवीट गीते सलग १७ तास गाऊन प्रसिद्ध गायक प्रशांत नासेरी यांनी सचिन तेंडुलकरला खास गीतमय शुभेच्छा दिल्या. हा एक विक्रम ठरला असून लिम्का बुक आॅफ रेकॉर्ड्स, एशिया बुक आॅफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक आॅफ रेकॉर्ड्समध्ये याची नोंद होणार आहे.
प्रशांत नागपूरचा राहणारा असून येथील एलआयटी कॉलेजमधून त्याने अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. बारावीचे शिक्षण शिवाजी सायन्स कॉलेजमधून घेतले. या विक्रमाबद्दल येथील चाहत्यांनी मंगळवारी एका समारंभात प्रशांतचा सत्कार केला. यावेळी त्याने आपला सूरमयी प्रवास उलगडला. बालपणापासून गायनाची आवड असलेल्या प्रशांतने आजवर शेकडो मैफलींमधून रसिकांना रिझविले आहे.
असा झाला विक्रम
लाडक्या सचिन तेंडुलकर याच्या ४४व्या वाढदिवसानिमित्त सुप्रसिद्ध गायक किशोरकुमार यांची १६१ हून अधिक गाणी त्याने गायिली. पुण्यातील शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बालगंधर्व रंगमंदिर येथे सकाळी ८ ला ‘हरफनमौला किशोरकुमार’ या संगीत गाण्याच्या कार्यक्रम सादरीकरणाला प्रशांत नासेरी यांनी सुरुवात केली आणि रात्री १२ च्या सुमारास हा विक्रम पूर्ण झाला.
ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर, शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया, संदीप पंचवाटकर, जितेंद्र भुरुख यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
काश्मीरहून आलेल्या गायिका इंदू बाला, नीलेश जेधे, विवेक थिटे, अनन्या महापात्रा, नरेंद्र शिंदे उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये डुएट गाण्यांसाठी सुवर्णा माटेगावकर, मधुरा दातार, जितेंद्र भुरुख, जितेंद्र अभ्यंकर, श्रावणी रवींद्र, राधिका अत्रे, धवल चांदवडकर, रेवा तिजारे, इंदू बाला (जम्मू) यांनी साथ दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Prashant Nasseri of Nagpur records Vikram in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.