नागपुरातील प्रतापनगर, जरीपटक्यात धाडसी घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 08:51 PM2019-05-06T20:51:48+5:302019-05-06T20:52:57+5:30

शहरात चोर, लुटारू कमालीचे सक्रिय झाले असून, गुन्हेगारांनी घातलेल्या हैदोसामुळे नागपूरकर अस्वस्थ झाले आहेत. प्रतापनगरात दोन दिवसात चार चेनस्नॅचिंगच्या घटना घडल्या आहेत. एवढेच काय, चोरट्यांनी प्रतापनगरातील एका निवृत्त लेफ्टनंट कर्नलच्या निवासस्थानाचे दार तोडून आत प्रवेश केला आणि रोख तसेच हिऱ्याच्या अंगठीसह पावणेपाच लाखांचा ऐवज लंपास केला. तर, जरीपटक्यातून रोख आणि सोन्याच्या दागिन्यांसह पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास केला. गेल्या २४ तासात हे दोन्ही गुन्हे नोंदले गेले.

Pratapnagar,jaripatka in Nagpur, brave burglary | नागपुरातील प्रतापनगर, जरीपटक्यात धाडसी घरफोडी

नागपुरातील प्रतापनगर, जरीपटक्यात धाडसी घरफोडी

Next
ठळक मुद्देलेफ्टनंट कर्नलचे दार तोडले : हिरेजडित रिंग, रोख आणि दागिने लंपास

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात चोर, लुटारू कमालीचे सक्रिय झाले असून, गुन्हेगारांनी घातलेल्या हैदोसामुळे नागपूरकर अस्वस्थ झाले आहेत. प्रतापनगरात दोन दिवसात चार चेनस्नॅचिंगच्या घटना घडल्या आहेत. एवढेच काय, चोरट्यांनी प्रतापनगरातील एका निवृत्त लेफ्टनंट कर्नलच्या निवासस्थानाचे दार तोडून आत प्रवेश केला आणि रोख तसेच हिऱ्याच्या अंगठीसह पावणेपाच लाखांचा ऐवज लंपास केला. तर, जरीपटक्यातून रोख आणि सोन्याच्या दागिन्यांसह पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास केला. गेल्या २४ तासात हे दोन्ही गुन्हे नोंदले गेले.
प्रतापनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवदत्त निवास, दीनदयालनगरात राहणारे रवींद्र वसंतराव थोडगे हे लेफ्टनंट कर्नल होते. दिल्लीहून निवृत्त झाल्यानंतर ते नागपुरात आले. ४ मेच्या सकाळी ते धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने सपत्नीक हिमाचल प्रदेशमध्ये गेले होते. ही संधी साधून चोरटे त्यांच्या निवासस्थानाच्या पहिल्या माळ्यावर मागच्या बाजूने चढले. त्यांनी गॅलरीच्या बाजूचे दार तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर शयनकक्षातील कपाटाचे लॉकर तोडून चोरट्यांनी हिºयाची रिंग, सोन्याचे दागिने तसेच ५० हजारांची रोकड असा एकूण ४ लाख ७१ हजारांचा ऐवज लंपास केला. सोमवारी सकाळी ही धाडसी घरफोडीची घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात प्रचंड खळबळ निर्माण झाली. प्रतापनगर पोलिसांसह वरिष्ठही घटनास्थळी पोहचले. त्यांनी चोराचा माग काढण्यासाठी सीसीटीव्हीची मदत घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, थोडगे यांच्याकडे सीसीटीव्ही नसल्याने पोलिसांची गोची झाली. दुष्यंत नारायणराव देशपांडे यांच्या तक्रारीवरून प्रतापनगर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला. चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.
जरीपटक्यात वृद्धेकडे घरफोडी
मुलीच्या गावाला गेलेल्या एका वृद्धेच्या दाराचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख आणि दागिन्यांसह पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास केला. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत १८ एप्रिल ते ५ मे च्या दरम्यान ही धाडसी घरफोडीची घटना घडली. या प्रकरणी रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
जमनाबाई गंगाराम श्रीवास (वय ८०) या जरीपटक्यातील विश्वासनगरात गल्ली नंबर ५ मध्ये राहतात. १८ एप्रिलला दुपारी त्या बालाघाटमध्ये राहणाऱ्या मुलीच्या घरी गेल्या. रविवारी परत आल्या असता त्यांना दाराचे कुलूप तोडून दिसले. चोरट्यांनी घरातील रोख ५० हजार रुपये आणि सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख, ७३ हजारांचा ऐवज चोरून नेल्याचे जमनाबाईंच्या लक्षात आले. चोरट्यांनी चोरी करताना घरातील सर्व साहित्य अस्तव्यस्त केले. धाडसी घरफोडीची ही घटना उजेडात आल्यानंतर परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले. या प्रकरणी जरीपटका पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला. चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.

 

Web Title: Pratapnagar,jaripatka in Nagpur, brave burglary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.