‘शब-ए-बारात’दरम्यान घरीच प्रार्थना करा; मुस्लिम राष्ट्रीय मंचचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2020 09:09 PM2020-04-07T21:09:16+5:302020-04-07T21:09:38+5:30
‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात ‘सोशल डिस्टन्सिंग’ पाळणे आवश्यक झाले आहे. अशा स्थितीत मुस्लिम बांधवांनी ‘शब-ए-बारात’च्या दिवशी घरूनच राहून प्रार्थना करावी. घराबाहेर निघू नये असे आवाहन मुस्लिम राष्ट्रीय मंचतर्फे करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात ‘सोशल डिस्टन्सिंग’ पाळणे आवश्यक झाले आहे. अशा स्थितीत मुस्लिम बांधवांनी ‘शब-ए-बारात’च्या दिवशी घरूनच राहून प्रार्थना करावी. घराबाहेर निघू नये असे आवाहन मुस्लिम राष्ट्रीय मंचतर्फे करण्यात आले आहे.
‘शब-ए-बारात’च्या दिवशी सर्व बांधवांनी घरूनच ‘दुआ’ मागावी, तसेच कुटुंबात ज्यांचे निधन झाले आहे किंवा देशासाठी जे शहीद झाले आहेत, त्यांच्यासाठी विशेष प्रार्थना करावी. ‘कोरोना’ला संपविण्यासाठी सर्वांनी एकत्रित येणे आवश्यक आहे. त्यामुळे सरकारच्या निर्देशांचे पालन झाले पाहिजे, असे मत मुस्लिम राष्ट्रीय मंचचे राष्ट्रीय संयोजक मोहम्मद अफजल यांनी व्यक्त केले. ‘शब-ए-बारात’च्या दिवशी तहसील, जिल्हे, राज्य व देशातील सर्व कब्रस्तान बंद ठेवावेत, असे आवाहनदेखील त्यांनी केले.