काटोल नगर परिषद अध्यक्षांसह २० आरोपींना अटकपूर्व जामीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:11 AM2021-08-13T04:11:13+5:302021-08-13T04:11:13+5:30

नागपूर : लाखो रुपयांच्या भूखंड नियमितीकरण घोटाळ्यात आरोपी असलेल्या काटोल नगर परिषदेच्या अध्यक्ष वैशाली ठाकूर, तत्कालीन मुख्याधिकारी अशोक गराटे ...

Pre-arrest bail granted to 20 accused including Katol Municipal Council President | काटोल नगर परिषद अध्यक्षांसह २० आरोपींना अटकपूर्व जामीन

काटोल नगर परिषद अध्यक्षांसह २० आरोपींना अटकपूर्व जामीन

Next

नागपूर : लाखो रुपयांच्या भूखंड नियमितीकरण घोटाळ्यात आरोपी असलेल्या काटोल नगर परिषदेच्या अध्यक्ष वैशाली ठाकूर, तत्कालीन मुख्याधिकारी अशोक गराटे यांच्यासह एकूण २० आरोपींना सत्र न्यायालयाने गुरुवारी सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला. न्या. एम. एस. आझमी यांनी हा निर्णय दिला.

१४ डिसेंबर २०२० रोजी काटोल पोलिसांनी उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर यांच्या तक्रारीवरून या आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ४२०, ४०९, १६६, १६७, ३४ अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. आरोपींनी संगनमत करून २००२ ते २०२० या कालावधीत दोन ले-आऊटमधील ७३ अवैध भूखंडांचे गुंठेवारी कायद्यांतर्गत नियमितीकरण करून लाखो रुपये मिळविले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशांची व कायद्यांची पायमल्ली करून हा घोटाळा करण्यात आला, असा आरोप आहे. आरोपींच्या वतीने ॲड. कमल सतुजा व ॲड. कैलाश दोडानी यांनी कामकाज पाहिले.

--------------------

असे आहेत इतर आरोपी

इतर आरोपींमध्ये सुभाष कोठे, चरणसिंग ठाकूर, जितेंद्र ठाकूर, किशोर गाढवे, राजू चरडे, माया शेरकर, शालिनी बनसोड, लता कडू, मनोज पेंदाम, प्रसन्न श्रीपटवार, संगीता हरजाळ, सुकुमार घोडे, वनिता रेवतकर, देवीदास कठाणे, शालिनी महाजन, जयश्री भुरसे, हेमराज रेवतकर व तानाजी थोटे यांचा समावेश आहे.

Web Title: Pre-arrest bail granted to 20 accused including Katol Municipal Council President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.