मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:12 AM2021-06-16T04:12:12+5:302021-06-16T04:12:12+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क काेंढाळी : महसूल विभागाच्यावतीने काेंढाळी-काटाेल मार्गावरील जाम नदी प्रकल्पात (ता. काटाेल) नैसर्गिक आपत्ती व मानवनिर्मित आपत्ती ...

Pre-Monsoon Disaster Management Training Workshop | मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यशाळा

मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यशाळा

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

काेंढाळी : महसूल विभागाच्यावतीने काेंढाळी-काटाेल मार्गावरील जाम नदी प्रकल्पात (ता. काटाेल) नैसर्गिक आपत्ती व मानवनिर्मित आपत्ती प्रसंगी शोध व बचावाकरिता एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयाेजन करण्यात आले हाेते.

या कार्यशाळेचे आयाेजन विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये करण्यात आल्याची माहिती समादेशक पंकज डहाके व सह समादेशक सुरेश कराडे यांनी दिली. यावेळी काटाेलचे उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर, तहसीलदार अजय चरडे यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी उपस्थित हाेते.

या कार्यशाळेत नैसर्गिक आपत्ती व मानवनिर्मित आपत्तीप्रसंगी बोट व उपलब्ध साधनांचा उपयोग करून नागरिकांचे प्राण कसे वाचवावे, कसे पोहावे व शोध व बचाव कसा करावा याबाबत प्रत्याक्षिकांसह प्रशिक्षण देण्यात आले. या कार्यशाळेत एसडीआरएफचे उपनिरीक्षक एस. एन मडावी व एस. एन. जंबाेली यांनी व महसूल विभागाच्या सोनकर, मुंडे, देवकाते, ठाकरे, खर्डे, घाटोळे, वानखेडे यांच्यासह इतर कर्मचारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, काटोल नगर परिषद, काटोल पंचायत समितीचे कर्मचारी तसेच अग्निशमन दल व होमगार्ड जवानांना मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापनचे प्रशिक्षण दिले.

Web Title: Pre-Monsoon Disaster Management Training Workshop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.