नागपुरात बालकांचे पूर्व प्राथमिक शिक्षण अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 12:00 AM2018-09-21T00:00:40+5:302018-09-21T00:02:02+5:30

गरीब, कष्टकरी, शेतमजुरांच्या शून्य ते सहा वयोगटातील मुलांच्या पोषण व आरोग्याबरोबरच पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी गावोगावी, वस्ती, मोहल्ल्यात अंगणवाड्या सुरू करण्यात आल्या आहे. अंगणवाड्यांसाठी विजेची विशेष तरतूद नसल्याने बहुतांश अंगणवाड्या सुरू झाल्यापासून आजपर्यंत अंधारात आहे. पूर्व प्राथमिक शिक्षणाच्या केंद्राचे काम अंधारात चालत असेल तर शिक्षण काय मिळत असेल?

Pre-primary learning of children in Nagpur is in the dark | नागपुरात बालकांचे पूर्व प्राथमिक शिक्षण अंधारात

नागपुरात बालकांचे पूर्व प्राथमिक शिक्षण अंधारात

Next
ठळक मुद्देअंगणवाड्यांमध्ये वीजच नाही : शासनाकडून तरतूदही नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गरीब, कष्टकरी, शेतमजुरांच्या शून्य ते सहा वयोगटातील मुलांच्या पोषण व आरोग्याबरोबरच पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी गावोगावी, वस्ती, मोहल्ल्यात अंगणवाड्या सुरू करण्यात आल्या आहे. अंगणवाड्यांसाठी विजेची विशेष तरतूद नसल्याने बहुतांश अंगणवाड्या सुरू झाल्यापासून आजपर्यंत अंधारात आहे. पूर्व प्राथमिक शिक्षणाच्या केंद्राचे काम अंधारात चालत असेल तर शिक्षण काय मिळत असेल?
एकात्मिक बाल विकास प्रकल्प हा भारत सरकारने पुढाकार घेऊन सुरू केलेल्या उपक्रमांपैकी एक असून राज्यातील महिला व बाल विकास विभागामार्फत कार्यान्वित करण्यात येतो. या प्रकल्पात बालकांना पोषण आहार, आरोग्य निगा आणि शाळापूर्व शिक्षण आदी सेवा संकलित स्वरूपात पुरवण्यात येते. मुळात हा प्रकल्प गरीब, आर्थिकदृष्ट्या कमकुवत, कष्टकरी कुटुंबीयांच्या मुलांसाठी राबविण्यात येतो. राज्यात मोठ्या संख्येने अंगणवाड्या आहेत. अंगणवाडी सेविकांच्या मोर्चामध्ये त्याची व्यापकता नेहमीच दिसून येते. बहुतांश अंगणवाड्यांना आजही स्वतंत्र इमारत नाही. ग्रामपंचायतीच्या एका भागात, किरायाच्या घरात अंगणवाड्या कार्यरत आहे. या केंद्रातून पूरक पोषण आहार, लसीकरण, आरोग्य तपासणी, संदर्भ आरोग्य सेवा, अनौपचारिक शालापूर्व शिक्षण, पोषण आणि आरोग्य शिक्षण आदी सेवा पुरविण्यात येतात. गावाखेड्यातील झोपडपट्ट्यातील बालकांसाठी अतिशय उपयुक्त असे अंगणवाडी केंद्र आहे. असे असतानाही अंगणवाड्या अंधारात असणे आश्चर्यच आहे.
उन्हाळ्याच्या दिवसात किंवा सध्याच्या वातावरणात पंख्याशिवाय राहणे शक्य नाही. अशा परिस्थितीत बालक दुपारच्या काळात येथे वास्तव्यास असतात. शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये असलेल्या अंगणवाड्यांमध्ये सूर्यप्रकाश सुद्धा नीट पडत नाही. त्यामुळे मुलांना काय शिक्षण देणार, कसे आरोग्य जपणार हा प्रश्नच आहे.
नागपूर जिल्ह्यात २४२३ अंगणवाड्या आहेत. ज्या अंगणवाड्या ग्रामपंचायतीच्या परिसरात आहे. त्यातील काही ग्रामपंचायतीने विजेचा पुरवठा केला आहे तर काही अंगणवाड्या ज्या भाड्याच्या घरात आहे, त्यांना घरमालकाकडून वीज पुरवठा केला जातो. मुळात अंगणवाड्यांसाठी विजेच्या संदर्भात स्वतंत्र तरतूद नसल्याचे अधिकारी सांगतात.

१०० अंगणवाड्या होणार सोलरवर
अंगणवाड्यांसाठी विजेची तरतूद नसल्याने पर्याय नाही. पण नागपूर जि.प.चा खनिज निधीमधून १०० अंगणवाड्या डिजिटल करण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी दोन कोटीचा निधी मंजूर झाला आहे. अशाच माध्यमातून अंगणवाड्या सोलरवर करण्याचा प्रयत्न आहे.
भागवत तांबे, महिला व बाल कल्याण अधिकारी

स्थानिक स्वराज्य संस्थेला खर्च करण्यास हरकत नाही
ग्रा.पं. ला महिला व बाल कल्याणासाठी १० टक्के निधी खर्च करावा लागतो. यातून अंगणवाडीचा वीज बिलाचा खर्च करता येतो. काही ग्रा.पं. हा खर्च करीत आहे. शहरात महापालिकेने सुद्धा वीज बिलावर खर्च करावा.
मनीष फुके, सरचिटणीस, नागपूर जिल्हा सरपंच सेवा संघ

 

Web Title: Pre-primary learning of children in Nagpur is in the dark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.