पूर्व आरटीओचे कामकाज ठप्प

By admin | Published: May 28, 2017 02:27 AM2017-05-28T02:27:07+5:302017-05-28T02:27:07+5:30

प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे (आरटीओ) कामकाज शिस्तबद्ध व सुनियोजित पद्धतीने व अधिक कार्यक्षमतेने चालू राहण्यासाठी

Pre-RTO work jam | पूर्व आरटीओचे कामकाज ठप्प

पूर्व आरटीओचे कामकाज ठप्प

Next

इंटरनेट सेवा बंद : अनेक जण रिकाम्या हाताने परतले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे (आरटीओ) कामकाज शिस्तबद्ध व सुनियोजित पद्धतीने व अधिक कार्यक्षमतेने चालू राहण्यासाठी व उमेदवारांच्या सोयीसाठी ‘सारथी ४.०’ बरोबरच ‘वाहन ४.०’ कार्यान्वित करण्यात आले. मात्र संथ गतीच्या या प्रणालीमुळे गैरसोयींचे प्रमाणच दिवसेंदिवस वाढत चालले आहे. विशेष म्हणजे, शुक्रवारी पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची इंटरनेट सेवाच बंद पडल्याने सर्वच कामे ठप्प पडली. कार्यालयाने इंटरनेटचे मासिक बिल न भरल्याने ही सेवा खंडित करण्यात आल्याचे सूत्राचे म्हणणे आहे.
नागपुरातील तीनही आरटीओ कार्यालयांमध्ये ‘सारथी ४.०’ व ‘वाहन ४.०’ ही नवी ‘वेब बेस’ प्रणाली सुरू झाली आहे. या प्रणालीमध्ये शिकाऊ वाहन परवाना व पक्क्या वाहन परवानासाठी लागणाऱ्या ‘आॅनलाईन अपॉर्इंटमेंट’सह इतरही अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अर्जासोबत डाऊनलोड करण्याची सक्ती करण्यात आली आहे. परंतु जेव्हापासून ही प्रणाली सुरू झाली आहे, तेव्हापासून आरटीओ अधिकाऱ्यांपासून ते कर्मचारी व अर्जदाराला विविध समस्यांमधून जावे लागत आहे. या प्रणालीला सुरू होऊन दोन-तीन महिन्यांचा कालावधी होत असताना सुरळीत झालेली नाही. याचा फटका सामान्यांना बसत आहे. काहींवर कार्यालयाच्या खेट्या मारण्याची वेळ आली आहे. शुक्रवारी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने परिवहन विभागाचे सचिव व आयुक्त नागपुरात असतानाही पूर्व आरटीओ कार्यालयाचे कामकाज बंद होते. सूत्रानुसार, कार्यालयाने इंटरनेटचे मासिक बिल भरले नसल्याने संबंधित कंपनीने ही सेवा खंडित केली. जेव्हा कार्यालय प्रशासनाच्या हे लक्षात आले तेव्हा दुपार झाली होती, पैशांची जुळवाजुळव करून सायंकाळी हे बिल भरण्यात आल्याची माहिती आहे. परंतु तोपर्यंत अनेकांना रिकाम्या हाती परतावे लागले.

Web Title: Pre-RTO work jam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.