काेराेना लसीकरणात ज्येष्ठांना प्राधान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:07 AM2021-03-20T04:07:36+5:302021-03-20T04:07:36+5:30
कामठी : तालुक्यात काेराेना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली असून, या माेहिमेत ज्येष्ठ नागरिकांना विशेष प्राधान्य दिले जात आहे, अशी ...
कामठी : तालुक्यात काेराेना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली असून, या माेहिमेत ज्येष्ठ नागरिकांना विशेष प्राधान्य दिले जात आहे, अशी माहिती नायब तहसीलदार आर. टी. उके यांनी दिली. त्यामुळे इतरांना ही लस घेण्यासाठी प्रेरित करावे, असे आवाहनही त्यांनी कामठी तहसील कार्यलयातील बैठकीत केले.
या बैठकीला कामठी शहरातील प्रभाग ११ ते १६ मधील गरसेवक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका प्रामुख्याने उपस्थित हाेत्या. ६० वर्षांवरील नागरिकांना काेराेनाची लागण हाेण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे सर्वांनी त्यांच्या प्रभागातील या वयाेगटातील ज्येष्ठ नागरिकांचे काेराेना लसीकरण करवून घ्यावे. ज्यांची इच्छा नसेल, त्यांना फायदे समजावून सांगत लस घेण्यासाठी प्रेरित करावे. काेराेना लसीकरणाची साेय कामठी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आली आहे. तिथे ही लस माेफत दिली जात आहे. त्यासाठी संबंधित व्यक्तीचा आधार व माेबाइल क्रमांक अनिवार्य आहे, असेही आर. टी. उके यांनी सांगितले. या बैठकीला नगरसेविका संध्या रायबोले, स्नेहलता गजभिये, पिंकी वैद्य, नगरसेवक लालसिंग यादव, अंगणवाडी सेविका तारा जगणे, प्राजक्ता रंगारी, प्रिया कठाणे, संतोषी नेवारे, सुनीता चव्हाण यांच्यासह इतर अंगणवाडी सेविका आणि आशासेविका उपस्थित होत्या.