जि.प.च्या पदभरतीसाठी पूर्व तयारी सुरू, परीक्षेचा अभ्यासक्रम व प्रश्नपत्रिकेसाठी  पुण्यात कार्यशाळा

By गणेश हुड | Published: April 26, 2023 01:57 PM2023-04-26T13:57:44+5:302023-04-26T14:00:06+5:30

सर्व जिल्हा परिषदेमधील १८९३९ पदे भरली जाणार

Preliminary preparation for Zilla Parishad recruitment has started | जि.प.च्या पदभरतीसाठी पूर्व तयारी सुरू, परीक्षेचा अभ्यासक्रम व प्रश्नपत्रिकेसाठी  पुण्यात कार्यशाळा

जि.प.च्या पदभरतीसाठी पूर्व तयारी सुरू, परीक्षेचा अभ्यासक्रम व प्रश्नपत्रिकेसाठी  पुण्यात कार्यशाळा

googlenewsNext

नागपूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात  सरळ सेवा कोट्यातील ७५ हजार पदे भरण्याचा निर्धार करण्यात आला आहे.  १५ ऑगस्ट २०२३ पूर्वी ही पडे भरावयाची आहेत. राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाच्या अधिनस्थ जिल्हा परिषद अंतर्गत गट क मधील आरोग्य व इतर विभागातील पदभरतीचा कालबध्द कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार सर्व जिल्हा परिषदेमधील १८९३९ पदे भरली जाणार आहेत. नागपूर जिल्हा परिषदेने भरतीसाठी पूर्व तयारी सुरू केली आहे. 

यासाठी प्रत्येक संवर्गासाठी परीक्षेची काठिण्य पातळी ठरवून दिलेली आहे.  परीक्षेचा अभ्यासक्रम व प्रश्नपत्रिकेचे स्वरूप यामधे सुधारणा करण्यासाठी ग्राम विकास विभागाचे अपर मुख्य सचिव यांचे अध्यक्षतेखाली पुणे येथे २८ व २९ एप्रिल रोजी दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत पदभरतीचा अभ्यासक्रम निश्चित करण्यात येणार आहे. यासाठी विविध समित्यांचे गठण करण्यात आले आहे.

या समित्यांमध्ये सर्व उपायुक्त (विकास) व (आस्थापना), अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्प संचालक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी व संबंधित विषयाचे तज्ञ यांचा समावेश आहे. भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची मागणी कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ सोहन चवरे यांनी राज्य शासनाकडे केली आ

Web Title: Preliminary preparation for Zilla Parishad recruitment has started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.