प्रेमवीर फसले!

By admin | Published: February 1, 2016 02:38 AM2016-02-01T02:38:43+5:302016-02-01T02:38:43+5:30

प्रेयसीच्या विरहात अस्वस्थ झालेल्या दोन गुन्हेगार प्रेमवीरांना त्यांच्या प्रेयसीमुळेच पोलीस कोठडीची हवा खावी लागली.

Premchir cropped! | प्रेमवीर फसले!

प्रेमवीर फसले!

Next

नागपूर : प्रेयसीच्या विरहात अस्वस्थ झालेल्या दोन गुन्हेगार प्रेमवीरांना त्यांच्या प्रेयसीमुळेच पोलीस कोठडीची हवा खावी लागली. मोहम्मद ग्यासुद्दीन ऊर्फ लालटू मोहम्मद याकूब (वय ३७) असे लोहमार्ग (जीआरपी) पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपीचे नाव आहे. तब्बल २० दिवसांच्या प्रयत्नानंतर राऊरकेला येथे जाऊन जीआरपीने लालटूला जेरबंद केले तर, दुसऱ्याचे नाव कोमल मोहन सेन (वय २२, रा. भीमवाडी) आहे. त्याला यशोधरानगर पोलिसांनी छत्तीसगडमध्ये जाऊन ताब्यात घेतले. विशेष म्हणजे, कोमलने पोलिसांच्या कस्टडीत असताना स्वत:च्या गळ्यावर चिरे मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. हे करून स्वत:चा जीव धोक्यात घालतानाच कोमलने पोलिसांच्याही हृदयाची धडधड वाढविली.

पत्नीच्या प्रेमात फरारी अडकला

रेल्वेगाड्यात लाखो रुपयांची चोरी करून फरार झालेल्या आरोपीला आपल्या दुसऱ्या पत्नीच्या संपर्कात राहणे महागात पडले. २० दिवस जाळे पसरविल्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी या आरोपीला अटक करण्यात यश मिळविले आहे.
मोहम्मद ग्यासुद्दीन ऊर्फ लालटू मोहम्मद याकूब (३७) असे आरोपीचे नाव आहे. त्याला राऊरकेला येथून त्याच्या दुसऱ्या पत्नीच्या घरून अटक करण्यात आली. तिला भेटण्यासाठी तो हावडावरून आला होता. रविवारी लालटूला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला १० दिवसांचा पीसीआर देण्यात आला. मूलतरु राऊरकेला येथील रहिवासी लालटूने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी छोटे किराणा दुकान उघडले होते. तेथे तो आपल्या पहिल्या पत्नीसोबत राहत होता. दुसरी पत्नी रेशमा राऊरकेलामध्ये राहते. फरार झाल्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी लालटूच्या संपूर्ण परिवाराचे मोबाईल क्रमांक ट्रेसिंगवर लावले होते. याच दरम्यान लोहमार्ग पोलिसांना लालटू आणि रेशमा यांनी मोबाईलवर संपर्क साधल्याची माहिती मिळाली. लालटू फरार झाल्यापासून अधिक सतर्क झाला होता. लोहमार्ग पोलीस उपनिरीक्षक चांभारे, दीपक डोर्लीकर, महेंद्र मानकर आणि अनिल मानकर यांच्या चमूने तीन दिवसापूर्वी लालटूच्या घरी छापा मारला. परंतु त्यांना हाती काहीच लागले नव्हते. परंतु थोड्याच वेळानंतर त्यांना तो राऊरकेला येथे येत असल्याचे समजले. ते त्याच्या घरी पोहोचले. परंतु त्याच्या घराला कुलूप दिसल्यामुळे ते आश्चर्यचकित झाले. परंतु तो राऊरकेला येथे येणार असल्याची माहिती पक्की असल्याची खात्री असल्यामुळे त्यांनी कुलूप तोडून दरवाजा उघडला असता लालटू आत बसलेला आढळला. १५ ते २० दिवसापूर्वी त्याला अटक केल्यानंतर तो रायगडजवळ रेल्वेगाडीचा वेग मंदावल्यावर पळून गेला होता. त्याने डेहराडून एक्स्प्रेसमधील प्रवासी आणि तामिळनाडू येथील रहिवासी सी. शेनबन चंद्रशेखर यांचे सोन्याचे दागिने लंपास केले होते.


प्रेयसीच्या विरहात आत्महत्येचा प्रयत्न

अल्पवयीन प्रेयसीला पळवून नेऊन तिच्याशी मंदिरात विवाह करणे एका तरुणाच्या चांगलेच अंगलट आले. पोलिसांनी त्याला अपहरणाच्या आरोपाखाली अटक केल्यामुळे त्याने स्वत:च्या गळ्यावर ब्लेडने चिरे मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी रात्री घडलेल्या या घटनेने पोलिसांमध्ये खळबळ उडवून दिली.
कोमल मोहन सेन (वय २२, रा. भिमवाडी, यशोधरानगर) असे जखमी आरोपीचे नाव आहे. तो कॅटरर्सकडे काम करतो. परिसरातील एका १६ वर्षीय मुलीशी त्याचे प्रेमसंबंध होते. ‘जिना मरना संग संग’ अशी शपथ घेतल्यानंतर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, कोमलने आपल्या अल्पवयीन प्रेयसीला घेऊन पळ काढला. ते छत्तीसगडमध्ये गेले आणि तेथे एका मंदिरात त्यांनी लग्न केले. दरम्यान, मुलगी बेपत्ता झाल्यामुळे पालकांनी कोमलवर संशय घेत यशोधरानगर पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. कोमलच्या मोबाईल ट्रॅकिंगवरून त्याला जेरबंद करण्यात आले. तो यशोधरानगर पोलिसांच्या कस्टडीत होता. शनिवारी रात्री ८ च्या सुमारास त्याने नैसर्गिक विधीला जातो असे सांगितल्याने हवलदार संजय मिश्राने त्याला शौचालयात सोडले. काही वेळेनंतर त्याच्या किंकाळ्या ऐकू आल्याने मिश्राने बघितले तेव्हा त्याने स्वत:च्या गळ्यावर ब्लेडने चिरे मारल्याचे दिसले. रक्तबंबाळ अवस्थेतील कोमलला यशोधरानगर पोलिसांनी लगेच मेयोत नेले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहे.

Web Title: Premchir cropped!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.