प्रेमीयुगुलाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:10 AM2021-07-07T04:10:31+5:302021-07-07T04:10:31+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क पारशिवणी : दाेघेही एकाच गावातील रहिवासी असल्याने त्यांच्या आपसातील ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले. त्यातच लग्न करण्याचा ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
पारशिवणी : दाेघेही एकाच गावातील रहिवासी असल्याने त्यांच्या आपसातील ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले. त्यातच लग्न करण्याचा विचार. मुलीचे वय कमी असल्याने घरच्या मंडळींचा लग्नाचा विराेध. लग्न करणे शक्य नाही म्हणून दाेघेही कमालीचे निराश झाले. या निराशेतून प्रेमीयुगुलाने प्रियकराच्या घरी विषारी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना पारशिवणी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील डुमरी (कला) येथे साेमवारी दुपारी घडली.
सोहन रूपचंद देवढगले (२६) व अंजली रमेश चौधरी (१५) दाेघेही रा. डुमरी (कला), ता. पारशिवणी अशी मृतांची नावे आहेत. साेहन व अंजली यांना लग्न करायचे असल्याने तसेच अंजली अल्पवयीन असल्याने या लग्नाला त्यांच्या कुटुंबीयांचा विराेध हाेता. दरम्यान, अंजली साेमवारी दुपारी २ ते ३ वाजेदरम्यान साेहमच्या घरी गेली. त्यावेळी साेहमची आई बाहेर गेल्याने घरी कुणीही नव्हते. दाेघेही आपसात चर्चा केल्यानंतर बाथरूममध्ये गेले आणि दार आतून बंद करवून घेतले. आई बाहेरून घरी परत आल्यावर तिला अंगणात कीटकनाशकाचा उग्र वास आला.
संशय आल्याने तिने आधी संपूर्ण घराची बारकाईने तपासणी केली. बाथरूमचे दार आतून बंद असल्याचे तसेच आतून प्रतिसाद मिळत नसल्याचे लक्षात येताच आईने शेजाऱ्यांच्या मदतीने दार ताेडले. त्यांना दाेघेही आत बेशुद्धावस्थेत पडून असल्याचे दिसले. माहिती मिळाल्यानंतर काही वेळाने पाेलिसांनी घटनास्थळ गाठले.
पाेलिसांनी दाेघांनाही लगेच रामटेक शहरातील उपजिल्हा रुग्णालयात नेले. तिथे डाॅक्टरांनी तपासणीअंती अंजलीला मृत घाेषित केले. त्यानंतर सायंकाळी साेहनने उपचारादरम्यान शेवटचा श्वास घेतला. या घटनेमुळे गावात शाेककळा पसरली हाेती. याप्रकरणी पारशिवणी पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद करून तपास सुरू केला आहे.
...
कमी वयामुळे लग्नास विराेध
काही महिन्यांपूर्वी साेहन व अंजली यांच्यातील ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले. त्यातूनच त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अंजली अल्पवयीन म्हणजेच १५ वर्षांची असल्याने त्यांच्या लग्नाला दाेघांच्या घरच्या मंडळींचा विराेध हाेता. या विराेधाची दाेघांनाही जाणीव हाेती. त्यामुळे दाेघांनाही निराशेने ग्रासले हाेते. याच निराशेतून दाेघांनीही टाेकाचे पाऊल उचलले.