प्रीपेड इलेक्ट्रिक मीटर म्हणजे सामान्य जनतेची लूट
By मंगेश व्यवहारे | Updated: June 6, 2024 19:11 IST2024-06-06T19:10:41+5:302024-06-06T19:11:02+5:30
Nagpur : संविधान चौकात तीव्र निदर्शने

Prepaid electric meter is loot of common people
नागपूर : समाजातील घटकांशी कुठलीही चर्चा न करता हुकूमशाही पद्धतीने ग्राहकांचे जुने इलेक्ट्रिक मीटर बदलून त्या ठिकाणी प्रीपेड स्मार्ट मीटर लावून जनतेची हजारो कोटींची लूट करण्याचे सरकारचे धोरण आहे. जनतेची लूट करणारे धोरण परत घ्यावे, या मागणीसाठी प्रीपेड इलेक्ट्रिक मीटर विरोधी नागरिक संघर्ष समितीने संविधान चौकात तीव्र निदर्शने केली.
आंदोलनात माजी आमदार एस. क्यू. जमा, ‘आयटक’चे सरचिटणीस श्याम काळे, डॉ. श्रीनिवास खांदेवाले, अरुण वनकर, विठ्ठल जुनघरे, गुणवंत सोमकुवर, सुरेंद्र शुक्ला, अशोक दगडे, शैलेश जनबंधू, सी. जे. जोसेफ, नरेश निमजे, मुकेश मासूरकर, महेश श्रीवास, प्रेम जोगी, संतोष सिंग, मोहन बावने, सिद्धार्थ कांबळे, रमेश शर्मा, मनोज पाटील, तुलसीराम तेलधरे, अरुण लाटकर, विजय वरखडे, विनायक परतेकी, धर्मेंद्र मंगलानी, उत्तम सुकळे, डॉ. सुरेश वर्षे, ॲड. मृणाल मोरे, नौशाद हुसेन आदी सहभागी झाले होते. यावेळी संघर्ष समितीच्या वतीने मुख्यमंत्री, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्या नावाने विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांना निवेदन देण्यात आले.