फ्लाईंग क्लब विमानांच्या टेस्ट फ्लाईटची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2021 11:44 PM2021-01-06T23:44:40+5:302021-01-06T23:47:02+5:30
'test flight' of the Flying Club aircraft, nagpur news साडेतीन वर्षांपेक्षा अधिक काळापासून बंद प्रशिक्षण विमानानंतर आता नागपूर फ्लाईंग क्लबच्या विमानांच्या टेस्ट फ्लाईटची शक्यता दिसत आहे. क्लबमध्ये देखभालीशी निगडित सर्व सोयी झाल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : साडेतीन वर्षांपेक्षा अधिक काळापासून बंद प्रशिक्षण विमानानंतर आता नागपूर फ्लाईंग क्लबच्या विमानांच्या टेस्ट फ्लाईटची शक्यता दिसत आहे. क्लबमध्ये देखभालीशी निगडित सर्व सोयी झाल्या आहेत.
फ्लाईंग क्लबमधील कर्मचाऱ्यांच्या बॅकलॉगवर भर देण्यात येणार आहे. परंतु चीफ फ्लाईंग इन्स्ट्रक्टरच्या (सीएफआय) नियुक्तीबाबत अद्यापही अनिश्चितता आहे. २०१९ च्या मध्यापासून २०२० पर्यंतचा काळ लहान विमानांचे इंजिन येण्याची वाट पाहण्यातच गेला. क्लबमध्ये कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे. सर्व रिक्त पदांनंतर आलेल्या अर्जांची छानणी सुरू आहे. यातील पात्र उमेदवारांना लवकरच मुलाखतीसाठी बोलाविण्यात येणार आहे. नागपूर फ्लाईंग क्लबचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद कुमार साळवे यांनी सांगितले की, टेस्ट फ्लाईटची तयारी सुरू आहे. रिक्त पदांवर लवकरच कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल. चीफ फ्लाईंग इन्स्ट्रक्टरच्या नियुक्तीसाठी प्रक्रिया सुरू आहे. जर चीफ फ्लाईंग इन्स्ट्रक्टर वेळेवर नियुक्त न झाल्यास असिस्टंट फ्लाईंग इन्स्ट्रक्टरच्या माध्यमातून टेस्ट फ्लाईट सुरू करण्यात येईल.
मिहानमध्ये होणार स्थानांतरित
नागपूर फ्लाईंग क्लब आता एअरपोर्ट परिसरातून मिहानमध्ये एअर इंडिया एमआरओजवळ ५ एकर जमिनीवर स्थानांतरित करण्यात येणार आहे. क्लबला ही जमीन मिळून बराच काळ झाला आहे. परंतु येथे आतापर्यंत कोणत्याची प्रकारचे बांधकाम सुरू झाले नाही. मिहानच्या जमिनीवर बहुतांश बांधकाम उशिराने सुरू झाले आहेत. नागपूर फ्लाईंग क्लबचे व्यवस्थापकीय संचालक साळवे यांनी सांगितले की, क्लबला स्थानांतरित करण्यात येणार आहे. त्यासाठी हँगर, कार्यालयाच्या इमारतीसह इतर आवश्यक बांधकाम करण्यात येईल. ही कामे कधी सुरू होणार हे त्यांनी स्पष्ट केले नाही.