'थर्टी फर्स्ट'च्या जल्लोषाची तयारी जोमात : संक्रमणाची धास्ती कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 11:17 PM2020-12-30T23:17:08+5:302020-12-30T23:19:26+5:30

'Thirty First' Preparations वर्षाचा अखेरचा दिवस अनेकांसाठी अनेकार्थाने महत्त्वाचा असतो. जुन्या वर्षाला जल्लोषाने निरोप देण्यासाठी सगळेच आतूर असतात. यंदा कोरोना संक्रमणाने या जल्लोषावर पाणी फेरले आहे. सरकारनेही मार्गदर्शिका जारी केल्या असल्याने सार्वजनिक स्थळांवर जल्लोषासंदर्भातील आयोजन होणार नाही.

Preparations for 'Thirty First' are in full swing: Fear of infection persists | 'थर्टी फर्स्ट'च्या जल्लोषाची तयारी जोमात : संक्रमणाची धास्ती कायम

'थर्टी फर्स्ट'च्या जल्लोषाची तयारी जोमात : संक्रमणाची धास्ती कायम

Next
ठळक मुद्देदिशानिर्देशांनी आयोजनावर फेरले पाणी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : वर्षाचा अखेरचा दिवस अनेकांसाठी अनेकार्थाने महत्त्वाचा असतो. जुन्या वर्षाला जल्लोषाने निरोप देण्यासाठी सगळेच आतूर असतात. अनेक जण कुटुंबासह बाहेर जातात तर काही जण शहरातच मित्रांसोबत थर्टी फर्स्टचा जल्लोष साजरा करतात आणि नव्या वर्षाचे स्वागत करतात. परंतु, यंदा कोरोना संक्रमणाने या जल्लोषावर पाणी फेरले आहे. सरकारनेही मार्गदर्शिका जारी केल्या असल्याने सार्वजनिक स्थळांवर जल्लोषासंदर्भातील आयोजन होणार नाही.

जल्लोषाच्या आनंदावर थोडे विरजण असले तरी सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचे स्वागत होणारच आहे. प्रत्येकच जण आपल्या अंदाजात हा सोहळा साजरा करणार आहेत. विशेष म्हणजे, येणारे २०२१ हे वर्ष केवळ नवे वर्ष नव्हे तर ते एक स्वप्न असणार आहे. या स्वागत सोहळ्याच्या आनंदात प्रत्येकच जण २०२० मध्ये आलेल्या महामारीला आणि टाळेबंदीत कुलूपबंद अवस्थेला विसरण्यास आतूर आहेत.

नव्या मार्गदर्शिकानुसार शहरात नव्या वर्षाच्या स्वागताचे सोहळे खूप कमी होणार आहेत. इच्छुकांनी अनेक योजना आखल्या आहेत. पोलीस आणि निर्बंधाच्या दूर जाऊन हा सोहळा साजरा करण्याची तयारी सुरू झाली आहे. अनेक जण कुटुंब आणि मित्रांसोबतच घरच्याघरी आयोजन करणार आहेत.

सोशल मीडियावर नव्या संदेशांची शोधमोहिम

थर्टी फर्स्टच्या तयारीसोबतच काही लोक वेगळ्र्या अंदाजात सेलिब्रेशन करण्याची तयारी करीत आहेत. सोशल मीडियावर शुभेच्छा देण्यासाठी नव्या संदेशांची शोधमोहिम सुरू झाली आहे. नव्या वर्षाचा शुभेच्छा संदेश वर्षभर आठवणीत राहावा, असे प्रयत्न केले जात आहेत.

जल्लोष तर होणारच

सार्वजनिक आयोजनाचे निर्बंध असले तरी काही हॉटेल व्यावसायिकांनी उपाय शोधले आहेत. वेगवेगळे पॅकेजेस ग्राहकांना देण्यात येत आहेत. ३१ डिसेंबरच्या दुपारपर्यंत थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन करण्यास इच्छुक असणाऱ्यांनी हॉटेलमध्ये चेक इन करायचे आहे. त्यांना पॅकेजनुसार रूम अलॉट केले जातील. रात्रीला हॉटेलमध्येच जल्लोषाचे आयोजन होईल. उत्तररात्री कुणाला घरी जायची परवानगी नसेल. दुसऱ्या दिवशी दुपारीच हॉटेलमधून चेकआऊट करावे लागणार आहे. अशा आयोजनाने दिशानिर्देशांचे पालनही होईल आणि जल्लोषही साजरा करता येणार, असा हा उपाय आहे.

Web Title: Preparations for 'Thirty First' are in full swing: Fear of infection persists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.